मास्क न बांधता फिरणाऱ्यांवर कारवाई : चार दिवसात ५६ हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 06:54 PM2020-09-22T18:54:15+5:302020-09-22T18:54:28+5:30
कारवाईसाठी बुलडाणा नगर पालिकेने ९ पथके स्थापन केली आहे.
बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येक नागरिकांना बाहेर फिरताना मास्क लावणे अनिवार्य केले आहे. मास्क न लावता फिरणाºया तसेच नियमांचे उल्लंघन करणाºया दुकानदारांविरुद्ध कारवाईसाठी बुलडाणा नगर पालिकेने ९ पथके स्थापन केली आहे. या पथकांनी १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाºयांकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तीन दिवस शहरातील व्यापाºयांनी आपली प्रतीष्ठाने बंद ठेवून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. मात्र, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र शहरात होते. प्रशासनाने आता प्रत्येक नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे तसेच मास्क बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आदेश नसले तरी कोरोना संसर्गाविषयी नियमांचे पालन करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर थुंकण्यास बंदी घालण्यात आली असून मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. नगर पालिकेने ९ पथकांची स्थापना करून शहरातील विविध भागात तैनात केले आहे. या पथकांनी १८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाºयाना नागरिक आणि व्यापाºयांकडून ५६ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे नगर पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.