अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; महसूल विभागाचे दुर्लक्ष
By विवेक चांदुरकर | Updated: May 25, 2024 16:36 IST2024-05-25T16:34:49+5:302024-05-25T16:36:50+5:30
बुलढाणा जिल्ह्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; महसूल विभागाचे दुर्लक्ष
विवेक चांदूरकर,संग्रामपूर : जिल्ह्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्या पृष्ठभूमीवर शनिवारी संग्रामपूर तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी चांगेफळ ते जळगाव जामोद मार्गावर चांगेफळ शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून विविध नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून वाहतूक सुरू आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष होते. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई सुरू आहे. शनिवारी सकाळी तहसीलदारांनी चांगेफळ शिवारात नवीन पासिंग ट्रॅक्टर निरीक्षणासाठी थांबविला. त्यामध्ये विना परवाना १ ब्रास अवैध वाळू आढळून आली. यावेळी चांगेफळ बु. येथील ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर अढाव याचा बयान नोंदवून ट्रॅक्टर तामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.