वेळेचे बंधन न पाळल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:34 AM2021-03-18T04:34:59+5:302021-03-18T04:34:59+5:30

जानेफळ : जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले निर्बंध व सूचना यांचे व्यापाऱ्यांनी पालन केलेच पाहिजे. ते आपणा सर्वांच्याच हिताचे ...

Action against traders for non-compliance with time constraints | वेळेचे बंधन न पाळल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई

वेळेचे बंधन न पाळल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई

Next

जानेफळ : जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेले निर्बंध व सूचना यांचे व्यापाऱ्यांनी पालन केलेच पाहिजे. ते आपणा सर्वांच्याच हिताचे आहे. परंतु याचे उल्लंघन होताना आढळल्यास व्यापाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करू, असा इशारा ठाणेदार राहुल गोंधे यांनी दिला. जानेफळ येथे गत काही दिवसांपासून काेेराेना संसर्ग वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर १६ मार्च रोजी स्थानिक पोलिस स्टेशनच्या आवारात व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बाेलत हाेते.

ठाणेदार गोंधे यांना काही दुकाने व हॉटेल हे वेळेचे बंधन झुगारून सुरूच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे १६ मार्च २०२१ रोजी तातडीने व्यापारी बांधवांची बैठक ठाणेदारांनी बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी हा सुरू असणारा सर्व गैरप्रकार व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत गेल्या काही दिवसांपूर्वीच कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या आपल्या जानेफळ गावाची परिस्थिती सुधारत असताना आपण ती पुन्हा बिघडू नये याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. परंतु आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत मास्कचा वापर टाळत असून व्यापारी बांधवांनासुद्धा फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे विसर पडला आहे. विना मास्क फिरणाऱ्या लोकांविरुद्ध तसेच नियमांचे व निर्बंधाचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सजग राहून याचे पालन करावे व कारवाई टाळावी असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी ठाणेदारांनी व्यापाऱ्यांनी सीसी कॅमेरे लावण्याचे आवाहन केले. या बैठकीस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गजानन उंबरकर, ग्रा. पं. सदस्य सय्यद महेबूब, शिवसेना उपतालुका प्रमुख विश्वासराव सवडतकर, संतोष नाहटा, रमेश लाहोटी, गणेश सवडतकर, विजय लाहोटी, अशोक बोरकर, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा हावरे, विजय नवले, विशाल फितवे, रमेश जाधव, कृष्णा थोरात, समाधान हिवरकर, अनिल घायवट, मनोज मंत्री, महादेव लाड, विशाल पडधरिया, कृष्णा गुळवे, सचिन वानखेडे, शाम चवरे, संदीप राऊत, युसूफ थोरात, पराग राठी, रवी मेहत्रे यांच्यासह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Action against traders for non-compliance with time constraints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.