अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई
By विवेक चांदुरकर | Published: March 23, 2024 10:35 AM2024-03-23T10:35:13+5:302024-03-23T10:35:43+5:30
तामगाव पोलिसांकडून साडे तिन लाखांचा मुद्देमाल जप्त.
विवेक चांदूरकर, अझहर अली, लोकमत न्यूज नेटवर्क, संग्रामपूर:- गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून अवैद्य दारूची तस्करी करणाऱ्या एकास तामगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हि कारवाई शुक्रवारी रात्री संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे करण्यात आली. तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथील पवन शंकर घुंगळ हा आरोपी शेगाव कडून पातुर्डा मार्गे उकळी बाजार येथे चार चाकी वाहनात अवैद्य विदेशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच तामगाव पोलिसांनी पातुर्डा बु. बस थांब्यावर नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान वाहन क्रं. एम एच ३० बी बी ७३९१ शेगाव कडून पातुर्डा मार्गे उकळी बाजार कडे जात होते. पोलिसांनी सदर वाहनाला थांबवून झरती घेतली असता अवैध विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी वाहन चालक आरोपीला दारू बागळणे तसेच वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारले. मात्र चालकाने परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने पंचनामा करून ३ लाख ५८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सरकारतर्फे पोलीस कर्मचारी विष्णू कोल्हे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस ठाण्यात उकळी बाजार येथील आरोपी पवन शंकर घुंगळ याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईत तामगाव पोलीस ठाण्यातील विष्णू कोल्हे, अशोक वावगे, विकास गव्हाड यांचा समावेश होता.