नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:14+5:302021-05-07T04:36:14+5:30
महसूल व नगरपंचायत प्रशासनाकडून संयुक्त पथकाने एका बांधकाम साहित्याच्या दुकानावर ४ मे रोजी दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. ...
महसूल व नगरपंचायत प्रशासनाकडून संयुक्त पथकाने एका बांधकाम साहित्याच्या दुकानावर ४ मे रोजी दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहे. त्यामध्ये लॉकडाऊन लावण्यात येऊन संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच काही दुकानांना निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु काही व्यावसायिक नियमांना न जुमानता नियमांचे उल्लंघन करून आपली दुकाने उघडी ठेवत आहेत. अशा दुकानदारावर महसूल व नगरपंचायत प्रशासनाने ४ मे रोजी संयुक्त दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई तहसीलदार समाधान सोनवणे, मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे यांनी केली आहे. या कारवाईमध्ये नगरपंचायतचे नामदेव गाडेकर, मंगलसिंग वटपाल, कुलदीप भोलाने, शे. शकील व कर्मचारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.