दाेन खासगी बसेसवर अमडापूर पाेलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:06+5:302021-05-12T04:36:06+5:30
अमडापूर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाबंदी केली असून संचारबंदी लागू केली आहे़ तरीही विनापरवानगी सुरत येथे काही ...
अमडापूर : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाबंदी केली असून संचारबंदी लागू केली आहे़ तरीही विनापरवानगी सुरत येथे काही खासगी बसेस प्रवशांची वाहतूक करीत आहेत़ अमडापूर पाेलिसांनी ११ मे राेजी दाेन खासगी बसेसवर कारवाई केली़
जिल्ह्यात काेराेना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाने १० मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत़ जिल्हा सीमा बंद असतानाही परराज्यात काही खासगी बसेस प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे़ अमडापूर पाेलिसांनी दि.११ मेे रोजी अमडापूर बसस्थानकाजवळ सुरतवरून वाशिमला जाणारी व एका सुरतला जाणाऱ्या खासगी बसेसवर कारवाई केली़ दोन्ही गाड्या पोलीस स्टेशनला जप्त केल्या आहेत व चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या बसेसमध्ये ३० ते ४० प्रवासी हाेते़ ही कारवाई ठाणेदार अमित वानखेडे, पीएसआय सोनवणे, एएसआय अयुब खान, वाघ, टेकाळे, पो.काॅ. नापते, गीते, चव्हाण यांनी केली़ या प्रकरणी दाेन्ही बसच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या बसमध्ये असलेल्या प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था ठाणेदार अमित वानखेडे यांनी केली.