मोताळा तहसीलच्या आठ कर्मचा-यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2016 01:56 AM2016-10-04T01:56:04+5:302016-10-04T01:56:04+5:30
महत्त्वपुर्ण सभेला गैरहजर राहणे भोवले!
Next
मोताळा (जि. बुलडाणा), दि. ३- तहसील प्रशासनाच्या महत्त्वपूर्ण सभेला गैरहजर राहणे व कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मोताळा तहसील कार्यालयातील आठ कर्मचार्यांची तहसीलदार खंदारे यांनी बिनपगारी केली आहे. तहसीलदारांच्या कारवाइने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. तहसीलमध्ये कार्यरत अव्वल कारकुन सी. एन. पाटील- १४ दिवस, एम. एस. सरकटे- १७ दिवस, तलाठी पी. आर. गोसावी- १0 दिवस, व्ही. व्ही. सोनटक्के-७ दिवस, एन. एन. किंगरे-३ दिवस, बी. एन. राठी- एक दिवस, बी. ई. पवार- दोन दिवस व रेशमा चव्हाण-एक दिवस अशा आठ कर्मचार्यांची तहसीलदार रुपेश खंदारे यांनी बिनपगारी केली आहे.