‘भाऊ’, ‘दादा’, ‘तात्यांना’ पोलिसांचा दणका; फॅन्सी नंबरप्लेट धारकांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 04:20 PM2018-05-24T16:20:30+5:302018-05-24T16:49:51+5:30
खामगाव: शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून गुरूवारी दुसऱ्या दिवशीही धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे फॅन्सी नंबर प्लेट धारकांसोबतच नंबरची छेडछाड करून ‘दादा’गिरी करणाऱ्या २०-२५ जणांना पोलिसांनी गुरूवारी वठणीवर आणले.
खामगाव: शहरातील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून गुरूवारी दुसऱ्या दिवशीही धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे फॅन्सी नंबर प्लेट धारकांसोबतच नंबरची छेडछाड करून ‘दादा’गिरी करणाऱ्या २०-२५ जणांना पोलिसांनी गुरूवारी वठणीवर आणले. यावेळी अनेक फॅन्सी नंबरप्लेटवर रंग पोतण्यात आला.
शहर पोलिस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गुरूवारी मुख्य रस्त्यावर तसेच विविध चौकातून फॅन्सी तसेच विना नंबर प्लेटची अनेक वाहने ताब्यात घेतली. ही वाहने पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आल्यानंतर या वाहनांच्या फॅन्सी प्लेटवर रंग लावण्यात आला. तसेच दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. बाजाराचा दिवस असल्यामुळे आसपाच्या खेड्यातील अनेक वाहन धारक गुरूवारी पोलिसांच्या तावडीत सापडले. पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये वाहतूक शाखेचे एएसआय अरविंद राऊत, मार्गरेट हंस, वाहतूक पोलिस योगेश चोपडे, संजय इंगळे, हागे, टेकाळे, नागरे यांनी ही कारवाई केली.
‘भाऊं’ची गोची: मोहिम सुरूच राहणार!
शहरातील बेशिस्त वाहतूक, विना नंबर प्लेट धारकांसोबतच फॅन्सी नंबर प्लेटवाल्या वाहन धारकांना वठणीवर आणेपर्यंत ही मोहिम सुरूच राहणार असल्याची ग्वाही शहर पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील ‘भाऊ’, ‘दादा’, आणि नंबर प्लेटवर छेडछाड करून आकर्षक नंबर प्लेट बनविणाºयांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले.
वाहनांवर नंबर न टाकणाºया तसेच कायद्याचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांविरोधात वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात दंडात्मक कारवाई केली जात आहे. गुरूवारी ३२ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली.
- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन खामगाव.