उघड्यावर शौचास जाणा-यांंवर कारवाई

By Ram.deshpande | Published: July 26, 2017 01:23 AM2017-07-26T01:23:46+5:302017-07-26T01:24:09+5:30

Action on open defecation | उघड्यावर शौचास जाणा-यांंवर कारवाई

उघड्यावर शौचास जाणा-यांंवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांच्या हवाली केले: अनेकजण लोटे सोडून पळाले!

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : उघड्यावर शौचास बसणाºया ३२ जणांना मंगळवारी सकाळीच गुड मॉर्निंग पथकाने पकडून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
धाड गावालगत जामठी रोड, धामणगाव रोड बस स्टँडलगत नदीपात्र, बायपास रोड करडी बोरखेड या ठिकाणावरून महिलांसह, नागरिकांना गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास बसणाºयांना ताब्यात घेतले. यावेळी महिलांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. दरम्यान, गुड मॉर्निंग पथकाची सुरू असणारी कारवाई पाहून उघड्यावर बसलेले अनेकजण लोटे जागेवरच सोडून पळून गेल्याची माहिती पथकातील कर्मचाºयांनी दिली. आजच्या गुड मॉर्निंग पथकाच्या कारवाईची धाडमध्ये दिवसभर चर्चा होती, तर बहुतेक उघड्यावर जाणाºयांना धास्ती बसली आहे. या ठिकाणी पथकाने उघड्यावर बसणाºयांवर कारवाई करून यामध्ये गणेश बोराडे, विष्णू सोनुने, लक्ष्मण चिंचोले, राजू इंगळे, मनोहर शिरसाट, गणेश अवसरमोल, संदीप विसपुते, रामेश्वर माहाले, बाळू जाधव, श्रीकांत जैन, नामदेव मोरे, सुनील पवार, गजानन लोखंडे, याकुब खान, अवी गुजर, ज्ञानेश्वर उबाळे, वसीम खान, कैलास कायस्थ, शिवलाल मोरे, दिलीप गुजर, सुधाकर शिरसाट, स्वप्निल हिवाळे, उमेश आपार, राहुल लोखंडे, शे.इब्राहीम, भास्कर राऊत, दत्तू खांडवे, गजानन सपकाळ, मोतीराम खांडवे, उमेश जाधव, संदीप कुटे, तौफीक खान अशा ३२ जणांवर कारवाई केली आहे. सकाळपासून पोलीस ठाण्यात उघड्यावर शौचास बसणाºयांना पाहण्यास ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
सदर कारवाईत पं.स. बुलडाणाचे बीडीओ बाळासाहेब वाघ, स्वच्छता मिशन समन्वयक विलास मानवतकर, अरुणा वाणी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी बी.एच. धंदर, एएसआय शेख अजीस, एलपीसी गंगा सुरडकर तर ग्रा.पं. कर्मचारी राजू थोरात, समीर इंगळे, संजय ताठे यांनी सहभाग घेतला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटीलसह पीएसआय गजानन मुंडे हे करीत आहेत.

बुलडाणा तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसणारावर वारंवार कारवाई मोहीम राबवणार. या कारवाईमुळे गावे लवकरच हगणदरीमुक्त होतील.
- बाळासाहेब वाघ, गटविकास अधिकारी, पं.स. बुलडाणा.

Web Title: Action on open defecation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.