रेल्वेची साखळी ओढल्याने २२ जणांवर कारवाई

By admin | Published: November 16, 2014 12:07 AM2014-11-16T00:07:25+5:302014-11-16T00:07:25+5:30

शेगाव येथे दर गुरुवारी होते कारवाई, आरपीएफची धडक मोहीम.

Action taken for 22 people by dragging a train chain | रेल्वेची साखळी ओढल्याने २२ जणांवर कारवाई

रेल्वेची साखळी ओढल्याने २२ जणांवर कारवाई

Next

शेगाव (बुलडाणा): दर गुरुवारी शेगावात थांबणार्‍या रेल्वे गाडीची चेन ओढुन येथील मंदिराजवळ गाडी थांबविण्याच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी आर पीएफने हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत गुरुवारी २२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. गुरुवारी नागपूर-भुसावळ पॅसेंजर आणि वर्धा भुसावळ पॅसेंजर या दोन पॅसेंजर गाड्यांना रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त इतर ठिकाणी चेन पुलिंग करून थांबविण्यात आली. याच वेळेस आरपीएफचे ठाणेदार बनकर यांनी लावलेल्या सापळ्यात चेन पुलिंग करणारे अडकले. यामध्ये दोघांवर चेन पुलिंग, तर २0 जणांवर अवैधरित्या रेल्वेतून उतरल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. २२ आरोपींना शेगाव येथून भुसावळ येथील रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ते थे काही जणांना दंड न्यायालयाने सुनावले.

Web Title: Action taken for 22 people by dragging a train chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.