विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:03+5:302021-04-19T04:32:03+5:30

पोलिसांनी शेदुर्जन ते मलकापूर पांग्रा येथपर्यंत मोहीम राबवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे बस स्टँड परिसरात शुकशुकाट पसरला होता. ...

Action on unwarranted wanderers | विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

Next

पोलिसांनी शेदुर्जन ते मलकापूर पांग्रा येथपर्यंत मोहीम राबवून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे बस स्टँड परिसरात शुकशुकाट पसरला होता. दरम्यान, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन ठाणेदार आडोळे यांनी केले आहे. संचारबंदी लागू असताना देखील काहीजण मास्क न लावता विनाकारण दुचाकीने फिरत आहेत. गर्दी करत आहेत, याची दखल घेत ठाणेदार आडोळे यांनी आपल्या फौजफाट्यासह येथे येऊन बस स्टँड परिसरात लोकांना चोप दिला. दुचाकी, चारचाकी वाहनाची तपासणी करून कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईची चर्चा दिवसभर होती. ही कारवाई ठाणेदार जितेंद्र आडोळे व दुय्यम ठाणेदार दीपक राणे, बीट जमादार नारायण गीते, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर, नितीन मापारी, पो.कॉ. पवार यांनी केली.

Web Title: Action on unwarranted wanderers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.