विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:27+5:302021-05-12T04:35:27+5:30

११ मे रोजी सकाळपासून पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे अमडापूर, उंद्री या दोन्ही ठिकाणी चिखली - खामगाव या ...

Action on unwarranted wanderers | विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई

Next

११ मे रोजी सकाळपासून पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे अमडापूर, उंद्री या दोन्ही ठिकाणी चिखली - खामगाव या मार्गावर शुकशुकाट दिसून आला. सर्व व्यावसायिकांनी या लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद देऊन नियमांचे पालन सुरू केले आहे. यामध्येसुद्धा काही लोक विनाकारण बाहेर फिरत असताना आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी कडक कारवाई करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासन स्तरावरून आदेश देण्यात आलेले आहेत. याकरिता नागरिकांनी मास्क लावावा, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावा, कोठेही गर्दी करू नये, असे आवाहन ठाणेदार अमित वानखेडे व आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना ठाणेदारांनी दिल्या आहेत.

Web Title: Action on unwarranted wanderers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.