शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या बियाणे कंपन्यांवर कारवाई होणार - नरेंद्र नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 06:03 PM2020-06-27T18:03:32+5:302020-06-27T18:03:40+5:30
ज्या कंपन्या शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील ४४३ शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. तसेच ५७७ हेक्टर शेतीवर बियाणे उगवले नसल्याचे चित्र आहे. तालुक ास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर पंचनामे करण्यात येत आहेत. तसेच बियाणे न उगवल्यास संबधीत कंपनीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे. ज्या कंपन्या शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी 'लोकमत'शी बोलतांना सांगितले.
बोगस बियाण्यांविषयी कृषी विभागाची भुमिका काय आहे?
बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून येत आहेत. या तक्रारींची तातडीने दखल घेउन तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येत. समित्यांच्या अहवालानंतर तक्रारींवर कारवाई करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार का?
जिल्हाभरातून अनेक शेतकऱ्यांनी बियाणे न उगल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीवर तज्ज्ञाचा समावेश असलेली समिती शेतकºयांच्या बांधावर जाउन पाहणी करीत आहे. बियाणे निकृष्ट असल्यान उगवले नसल्याचे समोर आल्यास संबधीत कंपनीला शेतकºयाला नुकसानभरपाई देण्यास सांगण्यात येईल.
महाबीजचेही बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत का?
महाबीजचे बियाणेही उगवले नसल्याच्या जिल्ह्यातील काही शेतकºयांच्या तक्रारी आहेत. बियाणे न उगवण्याचे अनेक कारणे असु शकतात. त्यापैकी बियाणे निकृष्टही असु शकते किंवा पावसाचा खंड, बी खोलवर पडणे आदींही असू शकते. नेमके कोणत्या कारणामुळे बियाणे उगवले नाही, याचा शोध समिती घेत आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्याविषयी सांगता येणार आहे.
पावसाचा खंड, पेरणी टाळावी!
सध्या अनेक तालुक्यांमध्ये पावसाचा खंड पडला आहे. काही तालुक्यात तर ४० मिमी पाउस झाल्यावरही पेरणी करण्यात आली आहे. शेतकºयांनी पावसाचा खंड पडल्यास पेरणीची घाई करू नये. तसेच अनेक शेतकरी बियाणे उगवले नसल्यास दुबार पेरणीची घाई करीत आहेत. बियाणे खोलवर गेल्याने उगवण्यास विलंब लागू शकतो. त्यामुळे, शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी.तसेच बियाणे उगवले नसल्यास कृषी विभागाक डे तक्रार करावी. तालुका स्तरावरही शेतकºयांना तक्रार करण्याची सोय करण्यात आली आहे. बियाणे दर्जेदार नसल्यास कंपन्यांना शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याविषयी सांगितले जाईल.ज्या कंपन्या सहकार्य करणार नाही, त्यांच्यावर कारवाई करु.
शेतकऱ्यांनी जोपर्यंत १०० मिमी पाउस होत नाही,तोपर्यंत पेरणी करू नये. याविषयी तीन लाख ९३ हजार शेतकऱ्यांना एसएमएसच्या माध्यमातून कळविले आहे. काही शेतकºयांनी पेरणीची घाई केल्याने बियाणे उगवले नाही. त्यामुळे,कृषी विभागाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
बियाणे उगवले नसल्याच्या जिल्ह्यातील अनेक शेतकºयांच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यावर कारवाई करणे सुरू आहे- नरेंद्र नाईक