बुलडाणा : वर्षभरात ३०४ टवाळखोरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 02:58 PM2020-02-23T14:58:31+5:302020-02-23T14:58:38+5:30

चिडीमारांवर वचक : दामिनी पथक सक्रिय

Actions on 304 roadside romeo in Buldhana during the year | बुलडाणा : वर्षभरात ३०४ टवाळखोरांवर कारवाई

बुलडाणा : वर्षभरात ३०४ टवाळखोरांवर कारवाई

Next

बुलडाणा : शाळा, कॉलेज, बसस्थानक परिसरात उभे राहून मुली, महिलांची छेड काढणाºया रोडरोमिआेंवर बुलडाणा शहर पोलिस स्टेशनच्या दामिनी पथकाची करडी नजर आहे. गेल्या वर्षभरात ३०४ तर चालू वर्षात ५६ टवाळखोरांवर या पथकाने कारवाई केली. त्यामुळे चिडीमारांवर वचक बसला आहे. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन जीवंत जाळल्याची घटना, हिंगणघाटच्या प्राध्यापक तरुणीला पेट्रोल टाकून जाळल्याच्या घटनेमुळे देशात तीव्र पडसाद उमटले. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी महिला, मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत दामिनी पथक सक्रिय केले आहे. दामिनी पथकाने गेल्या वर्षभरात ३०४ तर चालू वर्षात ५६ टवाखळखोरांवर कारवाई केली. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, एसडीपिओ रमेश बरकते, ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल चंदा साठे, अनिता गाडे, रेशमा गवई, संध्या कदम, सय्यद नसिम यांचा दामिनी पथकात सहभाग आहे.

या भागांवर  नजर

मुलींचे छेड काढणारे, चिडीमिरी करणारे, व्यसन करुन शाळा परिसरात फिरणाºयांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.  शाळा, कॉलेज, बसस्थानक, निर्जन स्थळे, बालाजी मंदिर, व्ह्यूव पॉर्इंट, चिंचोेले चौक, राणी बाग, येळगाव धरण परिसर, चैतन्यवाडी परिसर, खडकी रोड, जांभरुण रोड या भागात दामिनी पथकाची करडी नजर असते. या परिसरात चिडीमारी करणाºयांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

असे आहे कारवाईचे स्वरुप

चिडीमारी करणाºयांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११०/११७ नुसार कारवाई करण्यात येते.  आई-वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर समज देण्यात येते. पुन्हा असे कृत्य करणार नाही कशी कबुली ठाणेदारांना दिल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन केले जाते, अशी माहिती दामिनी पथकाकडून मिळाली.

Web Title: Actions on 304 roadside romeo in Buldhana during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.