चारचाकी लावण्यासाठी जागा पुरेना; पार्किंग रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:23 AM2021-02-19T04:23:28+5:302021-02-19T04:23:28+5:30
शहरात वाहतूक शाखेच्या वतीने दररोज बाजारपेठ भागात फिरून वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावरील वाहनांविरुद्ध कारवाई करतात. दंड वसूल करतात; मात्र ...
शहरात वाहतूक शाखेच्या वतीने दररोज बाजारपेठ भागात फिरून वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावरील वाहनांविरुद्ध कारवाई करतात. दंड वसूल करतात; मात्र तरीही दररोज बाजारपेठ भागात ही परिस्थिती कायमस्वरूपी दिसून येते. चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकी वाहनांवर मात्र मोठ्या प्रमाणात ही कारवाई होते. घरासमोर रस्त्यावर लावलेल्या चारचाकी गाड्यांसंदर्भात वाहतूक शाखेकडे तक्रारी येत नाहीत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर लावलेल्या या वाहनांवर कारवाई होत नाही. नो पार्किंगच्या जागेत वाहन उभे केल्यास त्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तशा प्रकारे बोटावर मोजण्या इतक्याच वाहनधारकांकडून दंड वसूल केला जातो.
जांभरून रोड, बाजार रस्ता सर्वांत त्रासदायक
बुलडाणा शहरातील बस्थानकाच्या बाजूने गेलेला जांभरून रोड व नगरपालिकेसमोरील बाजार रस्त्यावर ही समस्या सर्वांत अधिक आहे. संपूर्ण बाजारपेठेचा हा रस्ता असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी जड वाहने तसेच चारचाकी वाहने उभी केली जातात.
...तर वाहन मालकावर कारवाई
रस्त्यावर वाहन उभे केल्यास कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. परंतु बुलडाण्यातील वाहतूक पोलीस केवळ चाैकात बसूनच वाहतुकीवर नजर ठेवतात.
बुलडाण्यातील आठवडी बाजार येथे रविवारच्या दिवशी वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण होताे. वाहतूक शाखेकडून वाहतूक नियम माेडणाऱ्यांवर कारवाई केली जाते. वाहन मालकावर कारवाई होऊ शकते.