आदिवासी दिनी गुंजला वीर एकलव्याचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:16 PM2017-08-13T23:16:25+5:302017-08-13T23:16:41+5:30
बुलडाणा : बुलडाणा शहरात जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून सकाळी मोटारसायकल रॅली आणि संध्याकाळी सर्व आदिवासी बांधवांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये सर्वत्र वीर एकलव्याचा जयघोष करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा शहरात जागतिक आदिवासी दिन ९ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातून सकाळी मोटारसायकल रॅली आणि संध्याकाळी सर्व आदिवासी बांधवांनी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये सर्वत्र वीर एकलव्याचा जयघोष करण्यात आला.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी समाजबांधवांनी एकत्रित येऊन उत्सव समितीचे आयोजन केले होते. या समितीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसह आदिवासी दिन उत्साहात पार पडला. सकाळी १0 वाजताच्या सुमारास येथील भिलवाड्यात वीर एकलव्य, आदिवासी नायक बिरसा मुंडा, क्रांतिवीर तंट्या भिल्ल, समशेरसिंग पारधी, विरांगणा राणी दुर्गावती या आदिवासी अस्मितांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी गुलाबराव ठाकरे, रामू मोरे, अरुण बरडे, उत्तम मोरे, एकनाथ मोरे, बाळू मोरे, वसंता बरडे, राजेश टारपे, विनोद डाबेराव, गजानन सोळंके, ज्ञानेश्वर राठोड, नगरसेवक कैलास माळी तसेच समितीचे अध्यक्ष विनोद ठाकरे, कोषाध्यक्ष सुनील बरडे, लखन गुलाबराव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आदिवासी दिनानिमित्त शहरातून मोटारसायकल रॅली निघाली. मुख्य मार्गाने महत्त्वाच्या चौकांमधून निघालेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष आकर्षित केले. आदिवासी ध्वज आणि आदिवासी दैवतांचा जयजयकार करीत रॅलीने मार्गक्रमण केले. बस स्टॅण्डवर एकलव्याच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. संध्याकाळी ४ वाजताच्या दरम्यान भिलवाड्यातूनच मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रत्येक आदिवासी कुटुंब या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये रत्नमाला मोरे, गिरजा पवार, नंदिनी टारपे, सरला बरडे, मंगलाबाई निकम, मंताबाई ठाकरे, कुंताबाई पिंपळे, योगीता माळे, मंगला माळे, साईबाई बरडे यांनी आदिवासी महिलांना मिरवणुकीत सहभागी करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. दिवसभरातील संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या पदाधिकार्यांसह सुरेश पिंपळे, वसंता बरडे, सतीश मोरे, उमेश बरडे, विजय ठाकरे, संदीप गायकवाड, संतोष बरडे, किशोर ठाकरे, संतोष मोरे, विनोद माळे, प्रवीण बरडे, रवी मोरे, चंद्रकांत बरडे, दिनेश मोरे, विशाल गायकवाड, तुळशीराम गायकवाड, किरण ठाकरे, सोनू माळे, लखन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.