प्रशासनाकडून दिव्यांगांची अवहेलना - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:25 AM2017-09-04T00:25:33+5:302017-09-04T00:25:36+5:30
शेगाव: येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय दिव्यांग बांधवांच्या कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: येथील संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद विसावामधील वारकरी सभागृहात प्रहार अपंग क्रांती आंदोलन, अपंग कल्याण आयुक्तालय व यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय दिव्यांग बांधवांच्या कार्यशाळेचा २ सप्टेंबर रोजी समारोप करण्यात आला. यावेळी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, राज्यातील दिव्यांग बांधव अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. शारीरिक असहाय्यतेमुळे त्यांना सक्षमरीत्या जीवन जगता येत नाही. प्रशासनाकडून त्यांची अवहेलना केली जाते. शासनाकडून दिले जाणारे मानधनही तोकडे आहे. त्यामुळे दिव्यांगांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यात येऊन मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आपण शासनाकडे केलेली आहे. १0 सप्टेंबरपर्यंत शासनाने दिव्यांगांच्या समस्या मार्गी लावून मानधनात वाढ न केल्यास ११ सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र सं पर्कप्रमुख रामदास खोत, राज्य समन्वयक रामदास म्हात्रे, राजाभाऊ गोकुळाष्टमी, अभय पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख त था प्रहार अपंग क्रांतीचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा संजय इंगळे, नीलेश घोंगे, प्रहार महिला आघाडीच्या प्रांजली धोरण, युवराज देशमुख, अल्पेश भांड, राजू मसने, किरण दराडे, विनोद पवार, गोलू ठाकूर, दत्ता पाकधाने यांची उ पस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले की, दिव्यांगांसाठी बर्याच योजना आहेत; मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे सदर योजनांची अंमलबजाणी प्रभावी पणे होत नाही. दिव्यांगांच्या १९९५ च्या कायद्याची अंमलबजाणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आपला शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या राज्यातील पदाधिकार्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच दिव्यांगांच्या योजना, शासन निर्णय याची विस्तृत माहिती सांगणार्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पुस्तकाचे वाटपही करण्यात आले. यावेळी राज्यातील २ हजारावर दिव्यांग बांधव व भगिनींची उपस् िथती होती.