प्रशासनास फायर ऑडिटचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:05 AM2021-03-04T05:05:10+5:302021-03-04T05:05:10+5:30
मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत बुलडाणा : कोरोना संकटातून मध्यंतरी दिलासा मिळाल्यानंतर लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते. मात्र, ...
मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत
बुलडाणा : कोरोना संकटातून मध्यंतरी दिलासा मिळाल्यानंतर लग्नकार्य व इतर कार्यक्रम व्हायला लागले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मर्यादित उपस्थितीचे बंधन लागू करण्यात आल्याने मंगल कार्यालयांचे संचालक अडचणीत सापडले आहेत.
शौचालय वापराकडे दुर्लक्ष
धाड : गाव परिसर सदोदीत स्वच्छ राहावा, यासाठी स्वच्छ भारत मिशनअंतर्गत अनेकांना शौचालये उभारून देण्यात आली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून उघड्यावर घाण करण्याचा प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त
बुलडाणा : करवंड ते डाेंगरखंडाळा रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे, वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे असल्याने अपघातात वाढ झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
ऑनलाईन पध्दतीने शिक्षणाचे धडे!
किनगाव राजा : जिल्हाभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, मोबाईल, संगणक सुविधा असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. किनगाव राजा परिसरात याची अंमलबजवाणी सुरू आहे.
हरभरा उत्पादनात घट; शेतकरी चिंतेत
धामणगाव धाड : वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान संभवत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येत असल्याने नुकसान हाेत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप साेंगणी केली नाही त्या शेतकऱ्यांमध्येही उत्पादनातील घटमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांची साेंगणी झाली आहे.
पीकविम्याचा लाभ देण्याची मागणी!
दुसरबीड : सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीमुळे असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले हाेते. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. त्यांना त्वरित लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन
बुलडाणा : रस शोषणाऱ्या किडींचा उन्हाळी भुईमूग पिकावर प्रादुर्भाव आढळून येऊ शकतो. त्या अनुषंगाने या किडीची ओळख व व्यवस्थापनाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
पाणंद रस्त्यांच्या कामाची प्रतीक्षा
सुलतानपूर : परिसरातील पाणंद रस्त्यांना आमदार निधीतून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटणार आहे. परंतु महिनाभरापूर्वी मंजुरी मिळूनही अद्याप या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
बसस्थानक परिसरात डुकरांचा सुळसुळाट
बुलडाणा : शहरातील बसस्थानक परिसरात गत काही दिवसांपासून डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे, प्रवासी त्रस्त झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन डुकरांचा बंदाेबस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी हाेत आहे.