प्रशासन निगरगट्ट ; मजुरांची जीवघेणी वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:14+5:302021-09-02T05:14:14+5:30

‘त्या’ अपघाताची जखम अजून भळभळती आहे. पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटरवरून मजूर महाराष्ट्रात येतात. समृध्दी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे ते ...

Administration Nigargatt; Deadly transport of laborers continues | प्रशासन निगरगट्ट ; मजुरांची जीवघेणी वाहतूक सुरूच

प्रशासन निगरगट्ट ; मजुरांची जीवघेणी वाहतूक सुरूच

Next

‘त्या’ अपघाताची जखम अजून भळभळती आहे. पोट भरण्यासाठी हजारो किलोमीटरवरून मजूर महाराष्ट्रात येतात. समृध्दी महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे ते केवळ सरकार सांगते म्हणून नाही तर या मजुरांच्या मेहनतीवर ते अवलंबून आहे. आजही अवजड मशीनरी आल्या पण एक कोपरा मजुरांशिवाय पूर्ण होत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य असतानाही गरीब मजुरांच्या जीवाशी होणारा खेळ आजही राजरोस सुरूच आहे. याला ना पोलीस, ना महसूल प्रशासन ना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून अटकाव केला जातो. तढेगाव शिवारात झालेल्या अपघातात मजूर लोखंडी रॉडखाली दबून मेले, त्यामुळे बांधकाम किंवा इतर अवजड साहित्य असलेल्या वाहनातून मजुरांची वाहतूक केली जाऊ शकत नाही किंवा मजुरांसाठी असलेल्या स्वतंत्र सीट व्यवस्था असलेल्या वाहनाने कोणत्याच साहित्य वाहतुकीला परवानगी नसते. हे नियम आहेत, परंतु याच नियमांचा अमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना विसर पडला का? भीषण घटना होऊनही यंत्रणांनी कोणतीच ‘समज’ घेतली नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या सिंदखेडराजा परिसरात सुरू असलेल्या समृध्दी आणि अन्य बांधकाम कामावर मजुरांची अशीच जीवघेणी अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. फरक इतकाच की टिप्परची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. प्रशासन, संबंधित यंत्रणांनी कारवाई का करू नये, किंवा समृध्दी किंवा अन्य मोठ्या प्रकल्पावरील, ते खासगी असो किंवा सरकारी अशा कोणत्याच ठेकेदाराने मजुरांची अशी जीवघेणी वाहतूक करू नये यासाठी कारवाई करणे गरजेचे असताना, अद्याप कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. इतकेच नाही तर तेरा मजुरांचा बळी घेणाऱ्या यंत्रणेतील मूळ जबाबदारांना अजूनही साधे चौकशीसाठी बोलावले गेले नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. म्हणजे एवढा अपघात होऊनही केस फाईल बंद करण्यावरच अधिकचा जोर दिला जात आहे का, असा प्रश्न आहे.

Web Title: Administration Nigargatt; Deadly transport of laborers continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.