सैलानी यात्रेसाठी प्रशासन सज्ज!
By admin | Published: March 11, 2017 01:27 AM2017-03-11T01:27:13+5:302017-03-11T01:27:13+5:30
जिल्हाधिकारी झाडे यांनी केली पाहणी; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन.
विठ्ठल सोनुने
पिंपळगाव सराई(जि. बुलडाणा), दि. १0- सर्व धर्माचे ङ्म्रद्धास्थान असलेले हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानीबाबा यांचा यात्रा उत्सव शांततेत पार पडला. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घटता कामा नये, यासाठी सर्व स्तरातील अधिकार्यांनी दखल घ्यावी, अशा सूचना बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी सैलानी येथे यात्रा नियोजन बैठकीप्रसंगी केले.
१२ मार्चपासून सैलानीबाबा यात्रेला सुरुवात होणार आहे. यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ.झाडे यांनी सैलानीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी घेतलेल्या या बैठकीला बुलडाणा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे, नि.जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, पोलीस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी, तहसीलदार दीपक बाजड, रायपूर ठाणेदार जे.एन.सय्यद, गटविकास अधिकारी बी.डी.वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. या यात्रा नियोजन बैठकीत वाहतूक व्यवस्था, विद्युत पुरवठा, यात्रा परिसराची मांडणी, आरोग्यविषयक व्यवस्थापक, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन, अन्न भोजन, प्रतिबंधक उपाययोजना, सैलानी यात्रेकडे येणारे मुख्य रस्ते, अग्रिशामक दल, जनावरे व कत्तलखाने व्यवस्थापन, होळी, संदल मिरवणूक वाहनतळ, पाकिर्ंग व्यवस्था या सर्व विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. सैलानी यात्रेत गवळीबाबा, जांभळीवालेबाबा, झिरा परिसर, दर्गा परिसर, एस.टी.डेपो, वाहनतळ अशा सहा ठिकाणी पोलीस चौक्या लावण्यात आल्या, तसेच होळीसाठी चिखली, बुलडाणा आणि खामगाव नगरपालिकेकडून तीन अग्निशामक दल तैनात करण्यात येणार आहे.
या बैठकीला सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष शे.सम्मद, हाशम मुजावर, सरपंच शंकर तरमळे, रवींद्र शुक्ला, पोलीस पाटील रामेश्वर गवते, शे.जाहीर मुजावर, प्रदीप गायकवाड, सुनील शेवाळे, रशिद मुजावर, पोलीस पाटील साखरे, अजय शेवाळे यांच्यासह ग्रामस्थ व सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सैलानी यात्रेवर राहणार ड्रोन कॅमेरा नजर
सैलानी यात्रेत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, गुन्हेगारावर नजर ठेवण्यासाठी, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंदा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पहिल्यांदाच सैलानी बाबा यात्रेवर ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवल्या जाणार आहे.