कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीसाठी प्रशासन रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:34 AM2021-04-10T04:34:11+5:302021-04-10T04:34:11+5:30
कोरोना महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविणे सुरू केले आहे. असे ...
कोरोना महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहीम राबविणे सुरू केले आहे. असे असले तरी सदर लस टोचून घेण्यासाठी नागरिकांचा पाहिजे तसा उत्साह दिसत नाही. परिणामी, शासनाच्या मोहिमेस पाहिजे तसा अपेक्षित वेग मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे ८ एप्रिल रोजी लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ, गटविकास अधिकारी अस्मिता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी संतोष क्षीरसागर, तलाठी प्रमोद दांदडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद जायभाये, आरोग्य सेवक बी. के. चित्तेकर, सिद्धेश्वर सुरुशे, भिका भानापुरे, तोफीक शाह, कोतवाल दीपक अवचार, दीपक धोत्रे व आशा स्वयंसेविका आदी स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी ८ एप्रिल रोजी गावात फिरून कोरोना प्रतिबंधित लसीचे नागरिकांना महत्त्व पटवून दिले.
ओळी : कोरोना प्रतिबंधित लसीकरणाबाबत जनजागृती करताना अधिकारी व कर्मचारी.