रेतीघाटाकडे प्रशासनाचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:30+5:302021-07-19T04:22:30+5:30

आडगावराजा येथील रस्त्यांची दुरुस्ती करा किनगावराजा : आडगावराजा गावामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावामधील ...

Administration's attention to the sand dunes | रेतीघाटाकडे प्रशासनाचे लक्ष

रेतीघाटाकडे प्रशासनाचे लक्ष

Next

आडगावराजा येथील रस्त्यांची दुरुस्ती करा

किनगावराजा : आडगावराजा गावामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावामधील रस्त्यांवर सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

बुलडाणा परिसरात पावसाची हजेरी

बुलडाणा : परिसरात रविवारी दुपारी समाधानकारक पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर,

काही ठिकाणी सतत पाऊस कोसळत असल्याने शेतात काम करणे अशक्य झाले आहे.

तिसरी लाट येऊ नये, यासाठी यंत्रणा अलर्ट

बुलडाणा : आरोग्य यंत्रणा, विविध विभाग, संस्था व नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात यश आले आहे. आता तिसरी लाट येऊ नये, यासाठी सजग प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केव्हा

बुलडाणा : शहरात रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करण्यात येत आहे. त्यामुळे, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बेशिस्त वाहने उभी करणाऱ्या या चालकांवर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Administration's attention to the sand dunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.