पहिल्या पावसात झाली प्रशासनाची पोलखोल
By admin | Published: June 15, 2017 12:21 AM2017-06-15T00:21:26+5:302017-06-15T00:21:26+5:30
घाण पाणी रस्त्यावर : नागरी अरोग्यास धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : परिसरात दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामाची पोलखोल केली आहे. एकाच पावसात गावातील नाल्याची घाण रस्त्यावर आल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
डोणगाव हे जवळपास २५ हजार लोकसंख्येचे ६ वार्ड व १७ ग्रा.पं. सदस्य असणारे गाव. या गावातील नाल्याची साफसफाई नसल्याने पहिल्याच पावसात सदर नाल्यांमधील घाण ही रस्त्यावर आली असून, सदर घाणीची दुर्गंधी निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर प्रभातफेरी मार्गाने नागरिकांना सिमेंट रस्ता असून, त्यावर आलेल्या घाणीमुळे चालणेही कठीण झाले आहे, तर प्रत्येक वार्डात ठिकठिकाणी पाणी साचून त्यावर मच्छरांची निर्मिती होत असल्याने डोणगाववासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तरी प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांना साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.