विद्यार्थ्यांनी घेतली ३00 झाडे दत्तक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:09 AM2017-08-11T01:09:49+5:302017-08-11T01:10:24+5:30
खामगाव : येथील लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल मॉडेल स्कूलमध्ये एक झाड एक राखी’ या स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांंनी ३00 झाडे दत्तक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील लक्ष्मीनारायण इंटरनॅशनल मॉडेल स्कूलमध्ये एक झाड एक राखी’ या स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांंनी ३00 झाडे दत्तक घेतली.
निसर्गातील समतोल टिकवून ठेवण्यासाठी झाडाचे संवर्धन व संगोपण होणे ही काळाची गरज आहे. जर हा समतोल ढासळला तर याचे वाळवंट होण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंता स्कूलच्या प्राचार्य राजकुमारी चौहाण यांनी व्यक्त केली. यासारखे उपक्रम समाजामध्ये राबवून सामाजिक जनजागृती निर्माण होऊन झाडाच्या संख्येत वृद्धी व्हावी, अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्यात सर्जनशीलता विकसित व्हावी, यासाठी राखी तयार करणे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण स्कूलच्या प्राचार्य राजकुमारी चौहाण, प्राचार्य प्रवीण चव्हाण, जावरे मॅडम, आकाश कोल्हे, विशाल कोल्हे यांनी गुणदान केले. याप्रसंगी तोमर मॅडम, गणोरकर, नावकार, अंभोरे, देठे, पांडे, पाटील, माने, गावंडे, शबा मॅडम, ममता चव्हाण, पवार , चेतन महाजन, विनोद सर, विशाल तराळे यांनी परिश्रम घेतले.