चार वर्षांत ३६ मुले दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:43 AM2021-02-25T04:43:33+5:302021-02-25T04:43:33+5:30
मुले दत्तक देण्याच्या प्रक्रियेचा विचार करता यात एकूण तीन प्रकार असून दत्तक ग्रहण, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व असे हे तीन ...
मुले दत्तक देण्याच्या प्रक्रियेचा विचार करता यात एकूण तीन प्रकार असून दत्तक ग्रहण, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व असे हे तीन प्रकार आहेत.
--४१ जण प्रतीक्षा यादीत--
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत माहिती घेतली असता सध्या ४१ जण बालक दत्तक घेण्यास इच्छुक असून यापैकी २८ जणांची गृहचौकशी झाली आहे. बालक दत्तक घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत संबंधितांची सर्व पातळ्यांवर गृहचौकशी होते. त्यानंतर बालक दत्तक देण्यास बाल कल्याण समिती मान्यता देते. या प्रक्रियेदरम्यान संबंधितांचे समुपदेशनही करण्यात येते. बालक दत्तक दिल्यानंतर चार महिन्यांनी पुन्हा संबंधित पालकांकडे एकंदर परिस्थितीची पाहणी केली जाते. त्यानंतर न्यायालयाद्वारे बालक दत्तक दिल्याचा अंतरिम आदेश काढण्यात येतो.
--‘कारा’चीही एनओसी महत्त्वाची--
परदेशात बालक दत्तक देण्याची प्रक्रिया काहीशी किचकट आहे. कारा संस्थेकडून त्यासाठी एनओसी दिल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. प्रामुख्याने सुरक्षित समर्पणाला या संपूर्ण प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते आणि ते कधीही योग्य असते, असे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले.
--अशी आहे प्रक्रिया--
बालक दत्तक घ्यावयाचे असल्यास प्रथम ‘कारा’ संस्थेकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर संबंधितांची गृहचौकशी होते. तसेच २०१५ चा अधिनियम आणि केंद्रीय दत्तकग्रहण मार्गदर्शिका २०१७ चे योग्य पद्धतीने पालन करीत मुले दत्तक देण्याची प्रक्रिया पार पाडली जाते.
--सुरक्षित समर्पण गरजेचे--
नातेसंबंधात प्रामुख्याने बालक दत्तक देण्याचा देशात प्रघात आहे. त्यासाठी कौटुंबिक स्तरावर काही निर्णय घेतले जातात. मात्र राष्ट्रीय दत्तक प्रक्रियेद्वारे मुले दत्तक देण्याची (सुरक्षित समर्पण) प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत.
--वर्षनिहाय दत्तक घेतलेल्या मातापित्यांची माहिती--
२०१७-१८ - १६
२०१८-१९ - १५
२०१९-२० - ०५
२०२०-२१ - ०५ (प्रतीक्षेत)