२२ वर्षांंनंतरही ओझोन दिनाला जागरुकतेचा अभाव

By Admin | Published: September 16, 2016 02:54 AM2016-09-16T02:54:26+5:302016-09-16T02:54:26+5:30

आज ओझोन दिन; ओझोनचे प्रमाण घटल्याने ग्लोबल वार्मिंगचा धोका.

After 22 years ozone day lack of awareness | २२ वर्षांंनंतरही ओझोन दिनाला जागरुकतेचा अभाव

२२ वर्षांंनंतरही ओझोन दिनाला जागरुकतेचा अभाव

googlenewsNext

ब्रह्मनंद जाधव
बुलडाणा, दि. १५- ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी व पर्यावरणविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत घोषित करण्यात आला होता; परंतु या घोषणेला २२ वर्ष उलटल्यानंतरही ओझोन दिनाला जागरुकतेचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे ओझोन संवर्धन दिनच प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक पातळीवर विविध प्रयत्न केले जातात. त्यातीलच एक १६ सप्टेंबर रोजीचा ओझोन संवर्धन दिन आहे. जागतिक ओझोन संवर्धन दिनङ्घहा पर्यावरणाला जतन करण्याची आठवण करून देणारा दिवस म्हटला जातो. सन १९९४ ला युनायटेड नेशन्सच्या सर्वसाधारण सभेत ओझोन थराची वाढती घट लक्षात घेऊन १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून घोषित करण्यात आला. ओझोन थराची घट होण्यामागची कारणे पडताळून पर्यावरण संवर्धनासाठी पाऊले उचलावित, असा त्यामागचा उद्देश होता.
ओझोनचा थर पृथ्वीपासून १0 ते ५0 कि.मी. अंतरावर आहे. सर्वसाधारणपणे ओझोन ऑक्सिजनचे रेणू, अणु आणि सूर्यकिरणे यांच्या प्रक्रियेने बनलेला असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओझोनचा थर अतिनिल सूर्यकिरणे म्हणजे (यू.व्ही.बी) शोषून घेतो आणि जमिनीपयर्ंत स्वच्छ सूर्यकिरणे पोहोचविण्यास मदत करतो. जर ही किरणे तशीच अतिनिल रूपात जमिनीवर आलीत तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट आहेत. ज्यामध्ये कर्करोग, मोतीबिंदू, त्वचेचे रोग, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, त्वचेवर सुरकत्या पडणे, सागरी जिवांना धोका, यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वैश्‍विक तापमानवृद्धी, वनस्पती प्लवकांचा मृत्यू, वातावरण बदल असे अनेक परिणाम होतात. गेल्या काही वर्षात या ओझोनचे प्रमाण घटत चालले आहे. ओझोनचे घटते प्रमाण सजिवांसाठी धोक्याचे ठरत आहे. २२ वर्षानंतरही ओझोन संवर्धनाबाबत जनजागृती पाहिजे तेवढय़ा प्रमाणात झाली नसल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे.

Web Title: After 22 years ozone day lack of awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.