विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शाळेवर केली शिक्षकाची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 04:35 PM2019-01-30T16:35:00+5:302019-01-30T16:35:37+5:30
संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शिक्षण विभाग कामाला लागले. तात्काळ येथील शाळेवर शिक्षकाची नियुक्ती केली.
- अजहर अली
संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील विद्यार्थ्यांनी बुधवारी रोजी संग्रामपूर पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पंचायत समिती कार्यालयात विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच शिक्षण विभाग कामाला लागले. तात्काळ येथील शाळेवर शिक्षकाची नियुक्ती केली.
गेल्यावर्षी अकोली येथील प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी येथील मुख्याध्यापकास निलंबित केले. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. अकोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एकूण ८० विद्यार्थी आहेत. १ ते ४ पर्यंत ही शाळा असून यावर शिक्षकांचे मान्य पदे ३ आहेत तीन पैकी दोन कार्यरत असून एक पद रिक्त आहे. दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाकडे मुख्याध्यापकाचे प्रभार असल्याने चारही वर्गाचा भार एका शिक्षकावर येऊन पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक आक्रमक झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना पंचायत समिती आवारात आणून शाळा भरवली. येथील पालकांकडून शिक्षण विभागाकडे रिक्त असलेले पद भरण्यासाठी अनेक वेळा लेखी व तोंडी मागणी करण्यात आली परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने येथील शिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पालक आक्रमक होत विद्यार्थ्यांना पंचायत समिती आवारात शाळा भरवली. पालकांचे अनोखे आंदोलन पाहून शिक्षण विभागही कामाला लागले कार्यालयात फिरते विशेष असलेले शिक्षकाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यात अनेक शाळांवर एकूण २२ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त असलेली पदे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून भरण्यात येत नसल्याने बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाचे वेळकाढू धोरण व स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्षामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत असल्याचा आरोप होत आहे. अकोली येथील विद्यार्थ्यांसह पालक पंचायत समिती आवारात ठाण मांडून होते. जोपर्यंत येथील रिक्त पद भरल्या जात नाही तोपर्यंत दररोज येथे शाळा भरवण्यात येणार असल्याचा पवित्रा पालकांनी घेतला होता. त्याची धडकी घेत शिक्षणविभागाने तात्ळीने या शाळेवर शिक्षक उपलब्ध दिला. फिरते विशेष शिक्षक असलेले उमेश सोनोने यांची तात्पुर्ती त्या शाळेवर नियुक्ती करण्यात आल्याने पालक व विद्यार्थ्यांनी सदर आंदोलन मागे घेतले.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हाणुन फिरते विशेष शिक्षकाची तात्पुरती अकोली येथील शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे.
डब्ल्यु. एच. ढगे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पं. स. कार्यालय संग्रामपुर