अखेर कलालवाडी दलित वस्तीला टँकरव्दारे पाणीपूरवठा

By Admin | Published: May 22, 2017 07:21 PM2017-05-22T19:21:27+5:302017-05-22T19:21:27+5:30

शिवसंग्रामने दिला होता घागर मोचार्चा इशारा

After all, the water supply to the Kalalwadi Dalit residents was filled with tankers | अखेर कलालवाडी दलित वस्तीला टँकरव्दारे पाणीपूरवठा

अखेर कलालवाडी दलित वस्तीला टँकरव्दारे पाणीपूरवठा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगांवराजा :  कलालवाडी दलित वस्तीला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. वारंवार पाणी समस्या बाबत ग्रामपंचायत पंचायत समिती वार्षिक आमसभा याठिकाणी पाणी प्रश्नाबाबत तक्रारी करुनही या समस्यांकडे प्रशासन गांभीयार्ने घेत नव्हते. या समस्येचा पाठपुरावा करत कलालवाडी दलित वस्तीला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा म्हणून लोकशाही मागार्ने शिवसंग्राम संघटनेच्या वतीने घागर मोर्चा काढण्याचा इशारा देताच २० मे पासून टँकरने पुरवठा सुरु करण्यात येत आहे. तसे लेखी पत्र गटविकास अधिकारी यांनी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांना दिले.

कलालवाडी दलित वस्तीतिल जनतेला पाण्यासाठी वन-वन फिरावे लगत होते. उन्हाळयात दूर अंतरावरुन डोक्यावर हंडयाने पाणी अनावे लागत होते. येथील पुरुष, महिला रोजनदारीने काम करतात.  पाणी भरण्यातच त्याच्या अर्धा दिवस वाया जात होता. कलालवाडी येथील नागरिकांनी वेळोवेळी ग्राम पंचायत प्रशासनाकड़े मागणी करूनही ग्रामपंचायतने पाण्याचा प्रश्न गांभीयार्ने
घेतला नाही. आमसभेत देखील कलालवाडी येथील पाण्याचा प्रश्न खुप गाजला होता. त्यावेळी आमसभा अध्यक्ष आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी कलालवाडी या दलित वस्तित तात्काळ उपाय योजना करुण  पाणी पुरवठा करा असे निर्देश प्रशासनास दिले होते. परंतु प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केले नाही. शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जाहिर खान पठाण यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यासह कलालवाडी नागरिकांना सोबत घेऊन गटविकास अधिकारी आशीष पवार यांना पंचायत समिती कार्यालयात घेराव घालून कलालवाडी वस्तीत तात्काळ पाणीपुरवठा करा, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पंचायत समिति कार्यालयावर घागर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर पाणीपूरवठा करण्यात आला.

Web Title: After all, the water supply to the Kalalwadi Dalit residents was filled with tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.