५५ कि़मी. पायी प्रवासानंतर मजूर महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:54 AM2020-04-21T10:54:45+5:302020-04-21T10:55:03+5:30

मजूर महिलेने ५५ कि़मी. पायी प्रवास केल्यानंतर बुलडाण्यात सोमवारी सकाळी ८.३० वाजता एका गोंडस मुलीला जन्म दिला.

After the journey 55KM woman gave birth to a baby girl | ५५ कि़मी. पायी प्रवासानंतर मजूर महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

५५ कि़मी. पायी प्रवासानंतर मजूर महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म

Next

- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा: लॉकडाउनमध्ये घरी जाण्यासाठी निघालेल्या मध्यप्रदेशातील एका मजूर महिलेने ५५ कि़मी. पायी प्रवास केल्यानंतर बुलडाण्यात सोमवारी सकाळी ८.३० वाजता एका गोंडस मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे मजूर कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रूही तरळले... सोबतच मुलीच्या जन्माचे मनोभावे स्वागतही केले. मध्य प्रदेशातील या मजूरांना आता प्रशासन घरपोच पोहोचविणार असल्याने मुलीच्या जन्माने लॉकडाउनच्या काळात घराकचडची वाटही मोकळी करून दिल्याचा प्रत्यय आला.
मध्यप्रदेशमधील शिवपूरी जिल्ह्यातील गराठा या गावातील महिला व पुरूषांसह ११ मजूर देऊळगाव मही येथे कामानिमित्त राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पाच मुलेही होती. परंतू लॉकडाउनमुळे काम बंद असल्याने या मजुरांनी आपल्या गावी परत जाण्याचा निर्णय घेतला. परंतू जाण्यासाठी कुठल्याही वाहनांची व्यवस्था नसल्याने हे सर्व मजूर आपल्या मुलाबाळांसह पायी निघाली. देऊळगाव मही येथून जवळपास ५५ कि़मी.चा प्रवास करून रविवारी रात्री बुलडाणा येथे हे मजूर पोहचले. दरम्यान, येथील अनुप श्रीवास्तव व बुलडाणा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची आस्थेने विचारपूस करीत त्यांना रात्रभर बुलडाण्यात राहण्याचा सल्ला दिला.
बुलडाणा नगर पालिकेची शाळा क्रमांक दोन याठिकाणी या मजूरांचे जेवण व झोपण्याची व्यवस्था झाली. पायी प्रवास करून थकलेले सर्व मजूर पहाटे साखर झोपेत असताना त्यातील रूख्मान पातीराम आदिवासी (२४) या गरोदर महिलेला प्रसुतीकळा जाणवण्यास सुरूवात झाली. सकाळी पाच वाजताची वेळ सर्व अनोळखी आणि त्यात महिलेला होणारा त्रास बघता सर्वच मजूरांची घालमेल झाली. अखेर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता एका गोंडस मुलीला त्या महिलेने जन्म दिला. प्रशासनानेही आपले सौहार्द दाखवत सर्व मजूरांना घरपोच पाठविण्यासाठी व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व मजूरांनी सुटकेचा निश्वास घेतला.

‘वन स्टॉप’ सेंटरकडून बाळाचे स्वागत
कोरोनाच्या संकटकाळात एका सुदृढ मुलीला जन्म देणाºया मातेसह मुलीचे वन स्टॉप सेंटरकडून स्वागत करण्यात आले. बाळाला नवी कपडे व मातेला साडीचोळी मास्क, सॅनिटायझर दिले. सर्वांना पेढे वाटप करून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. यावेळी महेंद्र सोभागे, सतिष उबाळे, आशा शिरसाट, बाळू मोरे, नीलेश घोंगडे, सुभाष मोरे, फकिरा नरवाडे, ज्ञानेश्वर पालकर, पोर्णिमा इंगळे यांनी मदतीचा हात दिला.

 

 

Web Title: After the journey 55KM woman gave birth to a baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.