दोन वर्षानंतरही शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम अपुर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 04:16 PM2019-08-02T16:16:24+5:302019-08-02T16:16:36+5:30
शेगाव : तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम पुर्णत्वास येवू शकले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप शेगाव- खामगाव- पंढरपूर मार्गाचे काम पुर्णत्वास येवू शकले नाही. त्यामुळे यंदा वाट खडतर असल्याने वारकऱ्यांसह भाविकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
संतनगरीत श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी लाखो भक्त येतात. यासह अनेक उत्सव काळात भजनी दिंड्यासह पायीवारी करणारे भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात श्रींची पालखी पंढरपूर येथून ६ रोजी खामगावरून लाखो भक्तांच्या पायीवारीसह शेगावला दाखल होणार ज्या खामगाव शेगाव या १६ कि.मी. रस्त्यांचे काम गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे ते आजही अपुर्णच आहे. हा पालखी मार्ग व भक्तांसाठी रस्त्यांच्या दुतर्फा जाण्या-येण्यासाठी वेगळा मार्ग तोही आजमितीस अपूर्णच का? असा सवाल भक्तांकडून उपस्थित केला जातोय.
शेगाव ते खामगाव हा १६ किमीचा रस्ता बांधकामात कित्येकाचे प्राणाची आहुती या नियोजन शुन्य बांधकामाने द्यावी लागली. याला जबाबदार कोण हा प्रश्नही महत्वाचा ठरतो? ज्या कामाची गुणवत्ता नसल्यामुळे बहूतांश वेळा झालेल्या रस्ता हा उखडला खरा पण नियोजित वेळेत अद्यापही गुणवत्ता पुर्ण कामाची प्रतीक्षा हे भक्तांना करावी लागत आहे. पंढरपूर येथून परतीच्या प्रवासात खामगाव येथून लाखो भक्तांची मानवी साखळी दरवर्षी अन्नवानी पायांनी शेगावला येत असते. रस्त्यांच्या दुतर्फी गिट्टीचे ढिग व बारीक चुरडी व पेव्हरब्लॉक यासह रस्त्यावर बारीक चुरी रात्री अंधारात भरधाव वाहकांना न दिसल्यामुळे अपघात घडले आहेत. या कामाची गती काम मंदावली असतांना लोकप्रतिनिधींकडूनही कोणतीही विचारपूस केली जात नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. केवळ एका वर्षातच शेगाव- पंढरपूर मार्ग पुर्ण होईल असे आश्वासन मिळाले होते. मात्र आजरोजी अडीच वर्षाचा कालावधी उलटला तरी काम पुर्ण न झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पायदळ वारीत सहभागी भक्तांना त्रास सहन होवू नये म्हणून दुतर्फा पायदळ मार्ग सुद्धा स्वतंत्र कार्यान्वीत करण्यात आला आहे. त्याचेही काम अनेक ठिकाणी अपुर्ण आहे. सध्या पावसाळ््याचे दिवस असल्याने निश्चितच भक्तांना या खडतर वाटेतूनच श्रींच्या दर्शनाला यावे लागणार आहे.
(तालुका प्रतिनिधी)