अनलॉकनंतर आता पालिका निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:16+5:302021-06-11T04:24:16+5:30
--प्रशासकीय कामेही रखडली-- नऊ पालिकांची येत्या काळात निवडणूक होण्याची शक्यता असली तरी नवीन बदलानुसार प्रभागरचना, मतदार यादी त्यानंतर आरक्षण ...
--प्रशासकीय कामेही रखडली--
नऊ पालिकांची येत्या काळात निवडणूक होण्याची शक्यता असली तरी नवीन बदलानुसार प्रभागरचना, मतदार यादी त्यानंतर आरक्षण सोडत अशा प्रक्रिया बाकी आहे. त्यास मोठा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्धारित मुदतीत या निवडणुका होतील की नाही, याबाबत शंका असली तरी राजकीय पक्षांना मात्र आता निवडणुकांचे वेध लागल्याचे चित्र आहे.
--पाच महिन्यांपासून प्रशासक--
मोताळा आणि संग्रामपूर या दोन्ही नगरपंचायतींची निवडणूक ही गेल्या डिसेंबर महिन्यातच होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नगरपंचायतींच्या निवडणुका न झाल्याने संपुष्टात आलेली मुदत पाहता तेथे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. अनुक्रमे १० हजार ३३१ आणि ७ हजार २५८ मतदार संख्या या दोन्ही नगरपंचायतीमध्ये आहे. विशेष म्हणजे प्रभाग रचना येथे पूर्णत्वास जावून त्यास विभागीय आयुक्तांनी मान्यताही दिली होती. मात्र, मतदार यादीचा कार्यक्रम आला नव्हता. परिणामी प्रसंगी ११ पैकी ९ पालिका आणि या दोन नगरपंचायतींची निवडणूक येत्या काळात सोबतच लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.