कोरोनाच्या लाटेनंतर जिल्ह्यात विदेशीपेक्षा ‘कंट्री’ ठरतेय वरचढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:27+5:302021-09-18T04:37:27+5:30

बुलडाणा : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सुरू करण्यात आलेल्या मद्यविक्रीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अगदी पाच महिन्यांत जिल्ह्यात ३५ लाखांहून अधिक ...

After the wave of corona, the district is becoming more 'country' than foreign | कोरोनाच्या लाटेनंतर जिल्ह्यात विदेशीपेक्षा ‘कंट्री’ ठरतेय वरचढ

कोरोनाच्या लाटेनंतर जिल्ह्यात विदेशीपेक्षा ‘कंट्री’ ठरतेय वरचढ

Next

बुलडाणा : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सुरू करण्यात आलेल्या मद्यविक्रीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अगदी पाच महिन्यांत जिल्ह्यात ३५ लाखांहून अधिक बल्क लिटर दारू तळीरामांनी घशात रिचवली आहे. या तुलनेत विदेशीचा खप कमी असून, बिअर आणि वाईनची विक्री जेमतेम आहे. असे जरी असले तरी या मद्यविक्रीतून शासनाला कोट्यवधीचा महसूल प्राप्त झाला आहे हे विशेष.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसऱ्या लाटेत मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे राज्य शासनाचा महसूल जरी बुडाला असला तरी तळीरामांचेही घशे कोरडे पडले होते. यातच दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यासह जिल्ह्यात मद्य विक्री सुरू करण्यात आली आहे. तेव्हा एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात लाखो बल्क लिटर दारू तळीरामांनी गटकली आहे. यामध्ये मात्र, देशी दारूची आकडेवारी लक्षणीय आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मद्यविक्रीला काहीसा ब्रेक लागला होता. मात्र, निर्बंध हटल्यानंतर त्यामध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले.

अशी झाली मद्यविक्री (बल्क लिटरमध्ये)

महिना देशी विक्री विदेशी बिअर वाईन

एप्रिल ३७६८७१ १२७७६८ ११२९७३ २९७४

मे ७४२८८१ १६५१७३ १२४९१२ २२८३

जून ८७६५३७ १९४९८५ १६१८७९ ३३७१

जुलै ७९४८८१ १८९७९६ १३९३९६ २९८८

ऑगस्ट ७८३३९३ २०१००४ १३०१५४ ३९९८

एकूण ३५७४५६३ ८७८७२६ ६६९३१४ १५६१४

जिल्ह्यात ही आहेत परवानाधारक मद्य विक्री दुकाने

जिल्ह्यात देशी दारू विक्रीचे १२७ दुकाने असून, त्यानंतर २८५ बार तर, १८ वाईन शॉपी आणि ५२ बिअर शॉपी आहेत. याच परवानाधारक दुकानातून मद्यविक्री होत असली तरी अद्यापही विनापरवाना अवैधरित्याही दारू विक्री होत आहे. याकडेही राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: After the wave of corona, the district is becoming more 'country' than foreign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.