तरुणाच्या आत्महत्येनंतर गावकर्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:18 AM2017-09-16T00:18:58+5:302017-09-16T00:19:28+5:30
चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकर्यांनी गावातील अवैध दारूची दुकाने बंद करण्याकरिता १५ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले. जोपर्यंत दारूची दुकाने व धाबे बंद करणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका गावकर्यांनी घेतल्यावर पोलिसांनी दारू दुकाने बंद करीत पोलीस पाटलाला निलंबित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सैलानी : चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकर्यांनी गावातील अवैध दारूची दुकाने बंद करण्याकरिता १५ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन केले. जोपर्यंत दारूची दुकाने व धाबे बंद करणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका गावकर्यांनी घेतल्यावर पोलिसांनी दारू दुकाने बंद करीत पोलीस पाटलाला निलंबित केले.
सचिन वामन देशमुख (वय २८) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यासाठी गेले असता गावकर्यांनी व महिलांनी विरोध केला. सदर तरुण युवकाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याला धाब्यावर अवैध दारू विक्री करणारे जबाबदार आहे. धाबे चालविणार्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही पंचनामा करू देणार नाही, असा महिलांनी व गावकर्यांनी पवित्रा घे तला होता. दोन दिवसांपूर्वीच याच गावातील महिलांनी माळशेंबा गावातील अवैध दारू विक्री बंद करावी, याचे बुलडाणा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. गावा तील वातावरण चिघळत चालल्यामुळे बुलडाणा पोलीस उ पविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी, चिखली तहसीलदार गायकवाड, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे.एन. सैयद, चिखली पो.स्टे. ठाणेदार देशमुख, बुलडाणा दंगाकाबू पथक यांनी माळशेंबा गावाकडे धाव घेऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली व या गावच्या परिसरातील सर्व धाब्यांची तोडफोड करून धाबे बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील महिला व गावकर्यांशी सर्व अधिकार्यांनी संवाद साधून मृ तदेह खाली घेऊन पंचनामा केला. माळशेंबा गावाजवळील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा असलेली दुकाने बांधकाम विभागाने तोडून टाकले. पुढील तपास रायपूर ठाणेदार जे.एन. सैयद व त्यांचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.
आ. राहुल बोंद्रे यांची भेट
माळशेंबा येथे दारूच्या नशेत घरामध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडताच गावकर्यांमध्ये अवैध दारू विक्री करणारांच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल बोंद्रे यांनी घटनास्थळावर जाऊन या घटनेची माहिती जाणून घेतली व गावातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. या गावातील सर्व अवैध धंदे बंद केले जाईल, असे आश्वासन आ.राहुल बोंद्रे यांनी महिला मंडळांना दिले.