पुन्हा अतिक्रमण!

By Admin | Published: March 26, 2016 02:20 AM2016-03-26T02:20:13+5:302016-03-26T02:20:13+5:30

बुलडाणा जिल्हा प्रशासनाची कारवाई सुरू; फौजदारी गुन्हे दाखल करणार.

Again encroach! | पुन्हा अतिक्रमण!

पुन्हा अतिक्रमण!

googlenewsNext

बुलडाणा : शहरातील हटविण्यात आलेले अतिक्रमण आज अचानक पुन्हा अतिक्रमकांनी काही ठिकाणी दुकाने उभी करून पुन्हा अतिक्रमण थाटण्यास सुरुवात केल्याने एकच खळबळ उडाली. प्रशासनाला सलग चार दिवस सुट्या आल्यामुळे हा प्रकार कुणीतरी करावयास लावला असावा? मात्र, याचा बोलवता धनी कोण? याचा शोध प्रशासन घेत आहे. दरम्यान, सुटीचा दिवस असतानाही नगरपालिकेने अतिक्रमण करणार्‍यांना समज देऊन अतिक्रमण करणार्‍यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा आदेश दिला.
अतिक्रमणाचा विळखा बसलेले बुलडाणा शहर कायमचे टपरीमुक्त करण्याचा निर्धार करीत नगरपालिकेने ३ डिसेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. जवळपास १५ दिवस ही मोहीम चालली. शहरातील मुख्य रस्त्यापासून तर वार्डा-वार्डातील गल्लीबोळात असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. सुमारे १४00 टपरी दुकाने हटविण्यात आली होती. अतिक्रमण उठविल्यामुळे ज्या व्यावसायिकांचे उदरनिर्वाहाचे साधन कायमचे गेले, अशा गरजू छोट्या व्यावसायिकांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेत शहरातील रिकाम्या असलेल्या शासकीय जागेवर ह्यबांधा, वापरा, हस्तांतरित कराह्ण या तत्त्वावर गाळे बांधून देण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. सध्या त्यावर कारवाईही सुरू आहे. मात्र धूलिवंदनाच्या दिवशी सुटीचा दिवस पाहून शहरातील काही अतिक्रमकांनी पुन्हा त्याच जागेवर दुकाने लावण्यास सुरुवात केली. दुसरे दिवशीसुद्धा शहरातील अनेक भागात लघुव्यावसायिकांनी टपरी दुकाने थाटल्याचे दिसत होते. अचानकपणे अतिक्रमण करण्यास कोणी आदेश दिला, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. शुक्रवार, २५ मार्च रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या पाठीमागील भागात लोकांनी दुकाने थाटली. तर जिल्हा परिषद शाळेची भिंत तोडून शाळेच्या हद्दीत काही व्यावसायिकांनी दुकाने लावली. जि.प. अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर, कोर्टाच्या बाजूला, जयस्तंभ चौक पुन्हा जागा अडवून ठेवल्याचे दिसत होते. शहरात अचानक सुरू झालेले हे अतिक्रमण पाहून हा काय प्रकार सुरू आहे? असा सवाल उपस्थित होत होता.

Web Title: Again encroach!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.