पुन्हा अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:01+5:302021-05-14T04:34:01+5:30
मे महिन्यातील मुहूर्त विवाहासाठी मे महिन्यात अनेक शुभ मुहूर्त आहेत. त्यामध्ये २ मे, ४ मे, ७ मे, ८ मे, ...
मे महिन्यातील मुहूर्त
विवाहासाठी मे महिन्यात अनेक शुभ मुहूर्त आहेत. त्यामध्ये २ मे, ४ मे, ७ मे, ८ मे, २१ मे, २२ मे, २३ मे, २४ मे, २६ मे, २९ मे, ३१ मे असे मे महिन्यातील शुभ मुहूर्त आहेत.
नियमांचा अडसर
या काळात कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असल्यास प्रशासनाने काही अटी घातल्या आहेत. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यावर अधिक भर आहे. यंदा शुभमुहूर्तांना कोरोनामुळे नियमांचा अडसर येत आहे. वाढती रुग्णसंख्या बघता कडक निर्बंध लागू केल्याने शासन नियमांची बाधा शुभमुहूर्तावर येत आहे.
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व
वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया सणाच्या निमित्ताने देव-पितरांना उद्देशाने ऋण फेडण्यासाठी दान, हवन केले जाते, या तिथीत जे कर्म केले जातात, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते, असे मानले जाते, तसेच या तारखेला नवीन वस्त्र, दागिने, शस्त्र, घर, जागा, वाहन खरेदी केल्यास त्या कायम टिकतात, सोने खरेदी केल्यास कायम संपत्ती येते.
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
बुलडाणा शहरात जवळपास २८ मंगल कार्यालय आहेत. परंतु मंगल कार्यालयात होणारे लग्न सोहळे बंद झाल्याने मंगल कार्यालयांचे गणित बिघडले आहे.
लग्नासोबतच वेगवेगळे समारंभ सुद्धा मंगल कार्यालयात होत होते. परंतु लाॅकडाऊनच्या अटींमुळे सर्वच कार्यक्रमांवर बंदी आल्याने मंगल कार्यालय चालक संकटात सापडले आहेत.
काही मंगल कार्यालय चालकांवर बँकांचे कर्ज आहे. त्यामुळे आता हे कर्ज कसे भरायचे? याचा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झालेला आहे.