राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Published: September 13, 2014 12:15 AM2014-09-13T00:15:17+5:302014-09-13T00:15:17+5:30

२0 अतिक्रमकांविरूद्ध साखरखेर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Against the encroachment on National Highway | राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

Next

मेहकर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१४ वरील तालुक्यातील शिवाजीनगर फाट्यावर अतिक्रमण करणार्‍या २0 जणांविरुद्ध साखरखेर्डा पोलिस स्टेशनला १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१४ वरील शिवाजीनगर फाट्यावर अतिक्रमण करुन ओटा बांधण्यात आला आहे. शिवाजी नगर येथील २0 जणांनी संगनमत करुन अतिक्रमण जागेत बांधलेल्या त्या ओट्यावर गजानन महाराजांची प्रतिमा लावली आहे. यासंदर्भात शासकीय बांधकाम मेहकरचे उपविभागीय अधिकारी रमेश प्रल्हादराव पाटील (५५) यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शिवाजी नगर येथील दिपक सिताराम काकडे, सुरेश काकडे, निलेश काकडे, रामदास वडतकर, शरद काकडे व इतर १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्राह्मणे हे करीत आहेत.

Web Title: Against the encroachment on National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.