मोदी- शाह यांच्या विरोधात बुलडाण्यात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 05:34 PM2019-12-13T17:34:42+5:302019-12-13T17:34:54+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
बुलडाणा: जमिअत उलमा-ए-हिंदच्यावतीने शुक्रवारी बुलडाणा व मेहकर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. काळ्या फीत लावून मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नागरिकत्व संशोधन बिलाचे निर्णयाचे निषेध करून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने सीएबी म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून भारतीय संविधानात कलम १२ ते ३५ नागरिकांचे मूलभूत अधिकार व अनुच्छेद १४ मध्ये देण्यात आलेल्या समतेच्या अधिकाराचे उल्लंघन आणि १९७६ च्या अनुच्छेद ४२च्या घटना दुरुस्ती नुसार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन असून संविधान विरुद्ध चे हे कट कारस्थान असल्याचा आरोप जमिअत उलमा-ए-हिंदच्यावतीने करण्यात आला.