कृषी कर्मचारी करणार आंदोलन
By Admin | Published: March 16, 2017 03:17 AM2017-03-16T03:17:25+5:302017-03-16T03:17:25+5:30
कर्मचार्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी : १६ मार्चपासून योजनेवर काम न करण्याचा निर्णय
चिखली, दि. १५ जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या अभियानाला शेतकर्यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसताना लक्षांक पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून वरिष्ठांकडून कर्मचार्यांना निलंबीत केल्या जात असल्याने हा प्रकार अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करीत चिखली २ चे कृषि पर्यवेक्षक एम.पी.देशमुख व सवणा कृषि सहाय्यक एस.एस.अंभोरे यांच्यावर झालेल्या अन्यायकारक निलंबनाच्या निषेधार्थ जिल्हा कृषि पर्यवेक्षक संघटना व कृषि सहाय्यक संघटनेने आंदोलनाचे अस्त्र उपसले असून याअंतर्गत १६ मार्च रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन छेडण्यासह जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेवर कामबंद आंदोलन छेडले आहे.
याबाबत कृषि पर्यवेक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.बी.काळे व कृषि सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए.यु.काकडे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना १५ मार्च रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार चिखलीचे कृषि पर्यवेक्षक एम.पी.देशमुख व सवणा कृषि सहाय्यक एस.एस.अंभोरे यांच्यावर कोणतीही चूक नसताना अन्यायकारक पध्दतीने निलंबन करण्यात आले असल्याचे स्पष्ट करून वरिष्ठांच्या या कृतीचा निव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.
निलंबणाची कारवाई अन्यायकाकर
कृषि पर्यवेक्षक एम.पी.देशमुख व सवणा कृषि सहाय्यक एस.एस.अंभोरे यांच्यावर अन्यायकारक पध्दतीने निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या या कृतीचा निव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. दरम्यान सदर निलंबनाची कारवाई ही अन्यायकाकर असल्यामुळे जिल्हय़ातील सर्व कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक संवर्गामध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.