सकल मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 05:30 PM2019-03-06T17:30:57+5:302019-03-06T17:31:21+5:30
सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
बुलडाणा : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून संजय ताकतोडे यांनी बीड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. या घटनेस भाजप सरकार जबाबदार असून या सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून अ, ब, क, ड च्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाने विविध आंदोलने केली. परंतू अद्यापही शासनाने समाजाला न्याय दिला नाही. यामुळे नैराश्यापोटी संजय ताकतोडे यांनी बिड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. ही घटना समाजासाठी अत्यंत दुदैवी असून माणूसकिला काळिमा फासणारी आहे. या घटनेला भाजप शासनाचे धोरण जबाबदार असल्याचे सांगत मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकºयांनी क्रांतीविर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे माजी सदस्य विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात चिखली- बुलडाणा मार्गावर काही वेळ ठिय्या मांडला. संजय ताकतोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट व कलम ३०२ प्रमाणे गुन्हे दाखल करा, संजय ताकतोडे यांच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची मदत द्या, त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकिय नोकरीत सामावून घ्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चेकºयांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात श्रीकृष्ण शिंदे, निवृत्ती तांबे, गजानन पवार, नारायण जाधव, एस. टी. सोनुने, पी. डी. महाले, ओमप्रकाश नाटेकर, भगवान गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, लता निकाळजे, हिंमतराव यंगड, राजू नाटेकर, समाधान निकाळजे, अनिल कांबळे, आकाश जाधव, पुंडलिक बावस्कर, मधुकर महाले, शंकर अवसरमोल, अंजली खुपराव, विजय पारेकर, सोनु सुरडकर, सुभाष निकाळजे, एच. ए. मानवतकर, डॉ. बी. आर. दाभाडे, संजय गायकवाड, अनिल भालेराव, संजय नामदेव गायकवाड सहभागी झाले.