राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:21 AM2020-04-27T11:21:24+5:302020-04-27T11:21:50+5:30
नगर पालिका आणि नगर पंचायतीतील कामगारांनी आजपासून काळीफित आंदोलन सुरू केले
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: राज्यातील ३५७ पालिका व नगर पंचायतील कर्मचारी तसेच सफाई कामगारांचा जीवन विमा काढण्यास राज्य शासनाची नकार घंटा कायम आहे. परिणामी राज्यातील सर्वच नगर पालिका आणि नगर पंचायतीतील कामगारांनी आजपासून काळीफित आंदोलन सुरू केले आहे. कोरोना संचारबंदी काळात या आंदोलनाला कर्मचाºयांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे.
कोरोना या विषाणू संसर्गाचा सामना करणाºया आरोग्य, ग्रामविकास आणि पोलिस कर्मचाºयांचा राज्य शासनाने गत महिन्यापूर्वीच विमा उतरविला आहे. मात्र, राज्यातील ३५७ नगर पालिका, नगर पंचायतीतील कर्मचारी आणि सफाई कामगारांना यामधून वगळण्यात आले आहे. कोरोना फायटर्स म्हणून सफाई कामगारांची भूमिका महत्वाची आहे. मात्र, त्यांचा तसेच पालिका कर्मचाºयांचा जीवन विमा काढण्यास राज्य शासनाची उदासिन भूमिका आहे. परिणामी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटनेच्यावतीने सोमवार २७ एप्रिलपासून काळीफित आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र सफाई कामगार संघटना आणि अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचा पाठींबा आहे. त्याचवेळी महानगर पालिकांमधील कर्मचारी संघटनांनी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
२५ हजारापेक्षा जास्त सफाई कामगारांचा समावेश!
्नराज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील सुमारे २५ हजार सफाई कामगार या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. राज्यातील ठिकठिकाणी हे आंदोलन होत आहे. त्यामुळे कोरोना संचारबंदी काळात राज्य शासनाची डोकेदुखी वाढणार असल्याचे संकेत आहेत. काही पालिका संघटनांनी राज्य शासनाविरोधात निदर्शनेही केली आहेत.
नगर पालिका आणि नगर पंचायती मधील कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात काळीफित आंदोलन केले आहे. तत्पूर्वी शासनाकडे निवेदनाद्वारे न्यायाची अपेक्षा केली होती. मात्र, शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
- विश्वनाथ घुगे
राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना, महाराष्ट्र
नगर पालिका आणि नगर पंचायतील कर्मचारी तसेच सफाई कामगारांवरील अन्याय दूर करण्यासाठी संपात सहभागी झालो आहोत. राज्यातील सर्वच पालिका आणि नगर पंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामध्ये खामगाव पालिकेतील कर्मचाºयांचाही समावेश आहे.
- मोहन अहीर
सदस्य, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना, महाराष्ट्र