खामगावात एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 08:13 PM2020-11-09T20:13:40+5:302020-11-09T20:14:03+5:30
Khamgaon ST Employees News खामगाव आगारातील एका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी घरीच ‘आक्रोश’ आंदोलन सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गत तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाºयांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे जळगाव खांदेश जिल्ह्यातील एसटी वाहकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच वेतनासाठी खामगाव आगारातील एका कर्मचाºयाच्या कुटुंबियांनी घरीच ‘आक्रोश’ आंदोलन सुरू केले.
कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आर्थिक झळ सोसणाºया एस.टी. कर्मचाºयांना ऐन सणासुदीच्या दिवसात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळातील कर्मचाºयांचे वेतन थकल्यामुळे हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियही अडचणीत आले आहेत. सोमवारी जळगाव खांदेश आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या मनोज अनिल चौधरी यांनी महामंडळातील कमी पगार आणि यातील अनियमितता यांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चौधरी यांनी ‘सुसाईड’ नोट मध्ये नमूद केले आहे.
अशातच खामगाव आगारातील कर्मचारी शिवाजी आनंदे यांच्या कुटुंबियांनी सोमवारपासून घरीराहूनच आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. आक्रोश आंदोलनात शिवाजी आनंद यांचे कुटुंबिय सहभागी झाले असून, खामगाव आगारातील जवळपास सर्वच कर्मचाºयांचा त्यांच्या आंदोलनाला पाठींबा आहे.
वेतनासाठी कर्मचाºयांना आंदोलन करावे लागावे, ही दुर्देवी बाब आहे. एसटी महामंडळ आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे एका कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागला. तर अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. वैतागातून आपल्या परिवाराने आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.
- शिवाजी आनंदे
अध्यक्ष
एसटी कामगार संघटना, खामगाव.