कृषी महोत्सवाची चुकली वेळ; शेतकरी सोयाबीन हंगामात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:40 PM2018-10-05T17:40:33+5:302018-10-05T17:41:29+5:30
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून येते.
शेतकºयांसाठी कृषी प्रदर्शनाचा अनुभव अत्यंत लाभदायी ठरतो. उत्पादनात वाढ, पिकांवर येणाºया रोग व किटकांना कशा प्रकारे नष्ट करायचे, नवनविन शेतीची उपकरणे, नविन वाण, कमी कालावधीत अधीक उत्पादन यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकºयांना कृषी प्रदर्शनात सहज मिळतात. त्यामुळे आता शेतकरी सुद्धा कृषी महोत्सव म्हटला की त्याठिकाणी आवर्जून हजेरी लावत आहेत. मात्र त्यासाठी कृषी महोत्सवाची वेळही शेतकºयांना हजर राहता येईल, असा असणे आवश्यक आहे. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे ‘कृषी महोत्सव २०१८’ ची सुरूवात ४ आॅक्टोबरपासून झाली आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान सप्ताहांतर्गत ४, ५ व ६ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणारा हा कृषी महोत्सव शेतकºयांच्या एैन सोयाबीन सोंगणीच्या हंगामात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त शेतकरी सोयाबीन हे नगदी पीक घेतात. शेतकºयांचे वर्षभरातील अर्थचक्र सोयाबीन या पीकावर अवलंबुन असते. त्यामुळे सोयाबीन सोंगणीच्या हंगामात शेतकरी कुठेच जाऊ शकत नाहीत. सध्या सोयाबीन कपाणीला आली असून जिल्हाभरातील शेतकरी सोयाबीन कापणीच्या या हंगामात व्यस्त आहेत; अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या कृषी महोत्सवात शेतकरी हजर राहू शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवामध्ये शुकशुकाटा पहावयास मिळतो. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिक्षक नाईक यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
कृषी तज्ज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसर
शेतकºयांच्या कामाच्या दिवसातच महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने कृषी तज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसर पडल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनाही कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ साधता आली नसल्याने महोत्सवामध्ये शेतकºयांची उपस्थिती जाणवत नाही.