पीक संरक्षणासाठी कृषी सहाय्यकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:46 PM2018-08-05T12:46:20+5:302018-08-05T12:46:58+5:30
हिवरा आश्रम : पिकाचे कीड, रोगापासून होणारे नुकसान टाळण्याकरीता क्रॉपसॅप प्रकल्पांतार्गत शेतकºयांना मागदर्शन केल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत कीड, रोगांपासून पीक संरक्षणासाठी सध्या कृषी सहाय्यकांची धडपड सुरू आहे.
- ओमप्रकाश देवकर
हिवरा आश्रम : पिकाचे कीड, रोगापासून होणारे नुकसान टाळण्याकरीता क्रॉपसॅप प्रकल्पांतार्गत शेतकºयांना मागदर्शन केल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत कीड, रोगांपासून पीक संरक्षणासाठी सध्या कृषी सहाय्यकांची धडपड सुरू आहे.
सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा पिकावरील कीड, रोगाच्या व्यवस्थापनासाठी पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला (क्रॉपसॅप) हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. सन २०१६ -१७ पासून हा प्रकल्प पूर्णपणे आॅनलाईन झाला आहे. सन २०१८-१९ मध्ये हा प्रकल्प कृषी विभागातील कर्मचाºयां मार्फत राबविण्याचा निर्णय घेऊन त्यानुसार अंमलबजावणीला सुरूवात झालेली आहे. सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा पिकांकरीता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांनी विकसीत संगणक प्रणालीचा वापर करून शेतकºयांना कीड रोगांच्या निरीक्षणाच्या माहितीवरुन क्षेत्रीय कर्मचाºयांच्याद्वारे पीक संरक्षणाचे सल्ले देण्यास सुरवात झालेली आहे.
शेतकºयांमध्ये कीड, रोगांची ओळख निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षीत करुन कीड, रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे. प्रादुभार्वाबाबत जागरुकता निर्माण करणे व पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे. किडरोगांच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळणे, वारंवार येणाºया किडरोगांबाबत सांख्यिकी माहिती संकलीत करणे व कायम स्वरुपाच्या व्यवस्थापना बाबत कृषि विद्यापीठांच्या सहाय्याने शिफारशी निश्चित करणे. हाच प्रकल्प राबविण्यामागील मुख्य उद्देश आहे.
अशी राबिवली जाणार कार्यप्रणाली
प्रत्येक कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांना आठवड्यातून दोन गावे व प्रत्येक गावात दोन निश्चित प्लॉट याप्रमाणे एकूण चार निश्चित प्लॉटवरील पिकांचे सर्वेक्षण करणे अनिवार्य आहे. प्रत्येक मंडळ कृषि अधिकाºयांना एकूण चार प्लॉटवरील पिकांचे सर्वेक्षण करावे लागते.
कृषीदुतांना दिले प्रशिक्षण
या प्रकल्पाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी कृषी महाविद्यालयातील कृषी कायार्नुभव सत्राचे विद्यार्थी यांची मदत घेण्याच्या आयुक्तालय यांच्या सूचना आहेत. त्या दृष्टीने विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम व समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील कृषी कायार्नुभव सत्राचे विद्यार्थी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.
सद्य:स्थितीत सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातील काही गावात लवकर लागवड केलेल्या कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा पादुर्भाव अढळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी फेरोमेन सापळे लावणे, किटकनाशकाची फवारणी घेणे याबरोबरच पादुर्भावग्रस्त शेतातील डोमकळ्या काढून त्या नष्ट केल्यास पुढील प्रादुर्भाव टाळणे शक्य होईल.
- नारायणराव देशमुख,
उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर