कृषी सहायकांचे आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2017 04:36 AM2017-06-20T04:36:28+5:302017-06-20T04:36:28+5:30

सुधारित आकृतीबंधासाठीचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण.

Agricultural Assistants Movement! | कृषी सहायकांचे आंदोलन!

कृषी सहायकांचे आंदोलन!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यानुसार टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येत असून, १२ ते १४ जून दरम्यान काळय़ा फिती लावून कामकाज व त्यानंतर १५ ते १७ जून दरम्यान लेखणी बंद आंदोलनानंतर १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.
कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधाबाबत अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच पदे वर्ग करण्याला कृषी सहायकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी सात टप्प्यात आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात तहसीलदार चिखली व तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन काळी फित लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता व त्यापश्‍चात लेखणी बंद आंदोलनदेखील करण्यात आले असून, आंदोलनातील तिसर्‍या टप्प्यानुसार १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अतिष काकडे, कार्याध्यक्ष दीपक बोरे, सचिव आर.एम.गवई, कोषाध्यक्ष काकासाहेब दळवी यांच्या नेतृत्वात जिल्हय़ातील कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान, सुधारित आकृतीबंध तातडीने तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १00 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषिसेवक पदाचा तीन वर्षांचा कालावधी शिक्षण सेवकांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावा, आंतरविभागीय बदल्या नियमित व्हाव्या, या मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेतर्फे देण्यात आले आहे.

Web Title: Agricultural Assistants Movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.