कृषी कन्यांनी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 03:23 PM2019-07-16T15:23:20+5:302019-07-16T15:23:39+5:30
बुलडाणा: तालुक्यातील अजिसपूर येथे डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयातील बी. एससी अॅग्रीच्या चवथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत सोमवारी वृक्षारोपण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: तालुक्यातील अजिसपूर येथे डॉ. राजेंद्र गोडे कृषि महाविद्यालयातील बी. एससी अॅग्रीच्या चवथ्या वर्षातील कृषि कन्यांनी ‘रावे’ (ग्रामीण कृषि कायार्नुभव) उपक्रमातंर्गत सोमवारी वृक्षारोपण केले. या प्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षारोपण करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळाभाऊ जगताप हे होते. तसेच प्रमुख उपस्थितीत सुभाष जगताप होते. यावेळी अजिसपूर येथील शेतकरी रामेश्वर पवार व रामकृष्ण पवार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषि कन्या कु. प्रियंका रामदास सोनवणे हिने कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी सुभाष जगताप यांनीही आपले विचार व्यक्त करीत उपस्थित शेतकºयांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन कु. प्रियंका रामदास सोनवणे व कु. प्रियंका किसन दवळकर यांनी केले. आभार कु. शिल्पा अशोक पवार हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काजल विलास जेऊघाले, पुजा सोनारे, सोनिया बुट्टी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावातील शेतकरी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामीण कृषि कायार्नुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर. यू. वाघ, कार्यक्रम अधिकारी एस. एस. चाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने वृक्षरोपण
बुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०१९ च्यावतीने बुलडाणा शहर व परिसरात वृक्षरोपण मोहिम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने रविवारी विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्थेच्या बीबीए कॉलेजच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वृक्षरोपण करुन त्यांना समितीने उपलब्ध करुन दिलेले ट्री गार्ड लावण्यात आले. याप्रसंगी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर काळवाघे, विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्थेच्या संचालिका अंजली परांजपे यांचेसह अनिरुध्द खानझोडे, अनिल रिंढे, दत्तात्रय सरोदे, कुणाल काळे, डॉ. नंदिनी रिंढे, डॉ. गायत्री सावजी, सौ. कापरे, मुकुंद वैष्णव, शैलेश खेडेकर, गजेंद्र राजपुत, मोहन पºहाड, गणेश भोसले, अभिलाष चौबे, सुनिल कानडजे, आदेश कांडेलकर, विठोबा इंगळे, ज्योती पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सावळे यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व सार्वजनिक उत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते.