बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा; कृषिमंत्री ना. फुंडकर यांच्या घराला कडेकोट सुरक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:13 PM2018-03-31T14:13:23+5:302018-03-31T14:13:23+5:30

खामगाव : वाशीम येथील ५० बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या खामगाव येथील बंगल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Agricultural minister Pundakar's house tight security! | बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा; कृषिमंत्री ना. फुंडकर यांच्या घराला कडेकोट सुरक्षा!

बियाणे उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा; कृषिमंत्री ना. फुंडकर यांच्या घराला कडेकोट सुरक्षा!

Next
ठळक मुद्देफुंडकर यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या प्रत्येक रसत्यावर बॅरिकेडस  लावण्यात आले असून, अनेकांचि चौकशी करण्यात येत आहे. बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी ना.फुंडकर यांच्या बंगल्यावर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ११ शेतकरी पोलिसांच्या ताब्यात.

खामगाव : वाशीम येथील ५० बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या खामगाव येथील बंगल्यावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ना. फुंडकर यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या प्रत्येक रसत्यावर बॅरिकेडस  लावण्यात आले असून अनेकांचि चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान  ११ शेतकऱ्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकºयांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ३१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा निर्णयावर शेतकरी ठाम होते. दरम्यान, ३० मार्च रोजी कृषी विभागाने पुन्हा एकदा शेतकºयांची बैठक बोलाविली होती. यावर तोडगा न निघाल्याने बियाणे उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी ना.फुंडकर यांच्या बंगल्यावर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठी अनुदान दिले जाते. गत सात वर्षांपासून बियाणे उत्पादन व वितरण या दोन्ही बाबीसाठीचे अनुदान शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळांना अनुदान देण्यात येते. वाशिम जिल्ह्यात सन २०१० पासून सुमारे १८ शेतकरी उत्पादक कंपन्या, गट, मंडळाने हजारो क्विंटल बियाणे उत्पादन करीत आहेत. आतापर्यंत बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळालेले आहे. पूर्वानुभव लक्षात घेता सन २०१६-१७ मध्ये ९९६.७० क्विंटल हरभरा बियाणे उत्पादन केले. त्यापोटी बियाणे उत्पादन व वितरण अनुदान मिळणे अपेक्षीत आहे, असे शेतकरी उत्पादक गट व कंपन्यांनी निवेदनात म्हटले आहे. सदर अनुदान मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींसह कृषी विभागाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला. अनुदान मिळाले नसल्याने उत्पादक गट व कंपनीच्या शेतकºयांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्याचे मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे निवेदन देत अनुदान देण्याची मागणी केली. यावर कोणताच सकारात्मक निर्णय न झाल्याने २२ मार्च रोजी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांना निवेदन व स्मरणपत्र देत ३० मार्चपर्यंत अनुदान न मिळाल्यास ३१ मार्च रोजी खामगाव येथे सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बियाणे उत्पादक गट व कंपनीच्या शेतकºयांनी दिला होता.

Web Title: Agricultural minister Pundakar's house tight security!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.