बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 02:27 PM2019-08-06T14:27:04+5:302019-08-06T14:27:41+5:30

जिल्ह्यातील १३ बाजार समितींसह उपबाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला.

Agricultural product Market Committees of Buldana District remain closed | बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प

बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शासकिय सेवेत सामावून घेण्याच्या मुख्य मागणीसाठी राज्यातील बाजार समितींच्या कर्मचाऱ्यांनी ५ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील १३ बाजार समितींसह उपबाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला. बुलडाणा, खामगाव, मलकापूर, चिखली या मुख्य बाजार समितींसह इतर बाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले असून शेतकºयांना याचा फटका बसत आहे.
मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तर काही कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ६ हजार ८७७ कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बाजार समिती कर्मचारी संघटनेने हा लढा पुकारला आहे. जिल्ह्यातील अडीचशेच्या वर कर्मचाºयांचा संपात सहभाग आहे. शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती, मार्केट यार्डच्या बाहेरील धान्य नियमन मुक्तीचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचा सेस बंद करुन सेवाशुल्क आकारणी भरण्याबाबत निर्णय घेण्याचा शासन विचार करीत आहे. त्यामुळे बाजार समित्या बंद पडतील. काही बाजार समिती कर्मचाºयांचे १० ते २० महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तेलंगणा व तामिळनाडू राज्यातील बाजार समित्यांच्या कर्मचाºयांप्रमाणे राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाºयांची मुख्य मागणी आहे.
बुलडाणा येथील बाजार समितीचे कामकाज सकाळपासून बंद ठेवण्यात आले. बाजार समिती सचिव वनिता साबळे, दिगंबर दांदडे, बबन निकम, जितेंद्र गवई, दीपक चव्हाण, सुनील काळवाघे, शशांक जेऊघाले, वर्षा भोंडे यांच्यासह इतर कर्मचारी संपात सहभागी झाले.
 
हमाल मापारी संघाचा पाठींबा
शासकिय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचाºयांनी सोमवारपासून संप पुकारला. जिल्ह्यातील १३ बाजार समिती व उपबाजार समितीत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. हमाल मापारी कामगार सेनेने संपाला पाठींबा जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे जिल्हा प्रतिनिधी विलास पुंडकर यांनी दिली.

वरवट बकाल येथील उपबाजारातील धान्य लिलाव बंद
वरवट बकाल : बाजार समिती कर्मचºयांना राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी ५ आॅगस्टला संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांनी कार्यालयीन कामकाज बंद ठेवून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कार्यालयाच्या मुख्यालयासमोर ठाण मांडून शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, सोमवारला वरवट बकाल उपबाजारातील धान्य लिलावसुद्धा बंद होता.

Web Title: Agricultural product Market Committees of Buldana District remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.