शेती मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:37+5:302021-05-28T04:25:37+5:30

खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीची मशागत उरकुन घेणे गरजेचे आहे. उसनवार किंवा कर्जाऊ रक्कम घेऊन पेरणी केली आणि निसर्गाने ...

Agricultural tillage works in final stage | शेती मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात

शेती मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात

Next

खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीची मशागत उरकुन घेणे गरजेचे आहे. उसनवार किंवा कर्जाऊ रक्कम घेऊन पेरणी केली आणि निसर्गाने साथ दिली, तरच रोजीरोटीचा भेडसावणारा प्रश्न सुटेल, या आशेपोटी बळीराजा शेतीची उन्हाळी मशागत करताना दिसत आहे. यामध्ये शेतीची नांगरट करून व फणपाळी करून पेरणीसाठी शेत तयार ठेवण्यासाठी धावपळ सुरू आहे. बागायती कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबक संचाची दुरुस्ती पूर्ण केली आहे. आता शेती कपाशी लागवडीसाठी पूर्णपणे तयार झाली आहे.

कपाशीचा पेरा घटणार

बोंडअळीमुळे कपाशीचे अत्यल्प उत्पादन हाती येत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. बोंडअळी नियंत्रणात आणण्यात कृषी विभागाला पाहिजे त्या प्रमाणात यश आलेले नाही. त्याच त्या उपाययोजना दरवर्षी सुचवण्यात येतात. मात्र त्याचा कुठलाही परिणाम होत नसल्याने उत्पादन घट होते. परिणामी उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने कपाशीचा पेरा घटण्याचे संकेत आहेत. त्या तुलनेत यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Agricultural tillage works in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.