शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:23+5:302021-06-09T04:42:23+5:30

जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळाला दिलासा बुलडाणा : काेराेनामुळे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर बंद करण्यात आले हाेते. काेराेनाची लाट ओसरत ...

Agricultural tillage works in final stage | शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात

googlenewsNext

जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळाला दिलासा

बुलडाणा : काेराेनामुळे जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर बंद करण्यात आले हाेते. काेराेनाची लाट ओसरत असल्याने दिव्यांग तपासणी शिबिर ९ जूनपासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.

बियाण्यांचे भाव वाढल्याने शेतकरी संकटात

किनगाव राजा : गत काही दिवसांपासून रासायनिक खतांबराेबरच बियाण्यांचेही भाव वाढल्याने, शेतकरी संकटात सापडले आहेत. खरीप हंगामासाठी शेती मशागत अंतिम टप्यात आली आहे. खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

नगरपालिकेची विशेष सभा रद्द

सिंदखेडराजा : नगरपालिकेच्या उपाध्यक्षा नंदा मेहत्रे यांच्याविरुद्ध १५ नगर सेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला हाेता. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. मात्र, उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्याने ही सभा रद्द झाली आहे.

किनगावजट्टू येथे वृक्षाराेपण

किनगावजट्टू : येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावातील विविध ठिकाणी वृक्षाराेपण करण्यात आले. खजूर, लिंबू, सीताफळ व इतर झाडे यावेळी लावण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित हाेते.

बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी

सुलतानपूर : खरीप हंगामाच्या पेरणीस येत्या काही दिवसात सुरुवात हाेणार आहे. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बियाण्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामाला आली गती

दुसरबीड : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक ६ मधील काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ८७ किमीचे काम दाेन पॅकेजमध्ये सुरू आहे. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांना लाभ हाेणार आहे.

किनगाव जट्टू येथील ग्रामस्थांना दिलासा

किनगाव जट्टू : येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला हाेता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

शिवराज्याभिषेक दिन साजरा

माेताळा : येथील शिवशाही प्रतिष्ठान व गजानन महाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गजानन महाराज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन दुग्धाभिषेक करून साजरा करण्यात आला.

खते-बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर द्या

बुलडाणा : हवामान विभागाने जून महिन्यातच पाऊस येणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या वर्षी लवकरच पेरणी सुरू हाेण्याची शक्यता असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर खते उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

डिझेल दरवाढीने शेती मशागत महागली

बुलडाणा : गत काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचे दरही वाढल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने डिझेलचे दर कमी करण्याची मागणी हाेत आहे.

तलाठ्याच्या गावभेटी कागदावरच

धामणगांव धाडः शेतकऱ्यांचा सातत्याने संपर्क येणाऱ्या तलाठ्यांना साज्यावर कामकाज करण्याचा नियम आहे, परंतु तालुक्यातील बहुतांश तलाठी गावभेटीचे वेळापत्रक पाळीत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Agricultural tillage works in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.