कृषी विभाग ‘इलेक्शन मोड’वर : पीक नुकसानाची पाहणी रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:43 PM2019-09-30T14:43:35+5:302019-09-30T14:43:49+5:30
कृषी विभागाचे कर्मचारीही निवडणूक विषयक कामांमध्ये गुंतले असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. कृषी विभागाचे कर्मचारीही निवडणूक विषयक कामांमध्ये गुंतले असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या निवडणूक विषयक कामांमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.
खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारीही निवडणूक विषयक कामांचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष कामांमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे साहाजिकच शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गत १५ दिवसांपासून खामगाव तालुक्यात सातत्याने पाऊस पडला.
पावसाचे प्रमाणही प्रचंड असल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली. उडदाचे पीक हातून गेले. त्यापाठोपाठ अनेक शेतांमध्ये सोयाबीन सडले. पहिल्या पेºयातील ज्वारी सध्या काळी पडण्याची भिती आहे. कपाशीच्या कैºया सडल्या असून उत्पादनात घट येणार आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, या हेतूने पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा सर्व्हे होणे अपेक्षित होते. काही शेतात कृषी विभागाचे कर्मचारीही गेलेही; परंतु या प्रक्रियेला वेग आलेला नाही.
परिणामी शेतकºयांचे नुकसान होऊनही त्यांना मदत मिळण्याची आशा धुसर होताना दिसत आहे. खामगाव तालुक्यात विशेष करून पिंपळगाव मंडळामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे.
पिंपळगावराजा, भालेगाव, ढोरपगाव, काळेगावसह परिसरात मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यात इतरही भागात पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे कृषी विभागाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे युद्धपातळीवर करावा व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
सुमारे १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खामगाव तालुक्यात सुमारे १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता, नुकसान झालेल्या क्षेत्राची नक्की माहिती देता येणार नाही, असे सांगण्यात आले. तरी सुमारे १००० ते १२०० हेक्टरवर नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
सध्या निवडणुकीच्या कामांमध्ये कृषी विभागाचे कर्मचारी गुंतले असले, तरी शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोमवारपासून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करण्यात येईल. त्यानंतरच प्रत्यक्ष किती क्षेत्रावर नुकसान झाले, याची माहिती देता येईल.
-गणेश गिरी
तालुका कृषी अधिकारी, खामगाव.